`काजळी`च्या गाळ उपसा बंदने काळजी वाढली!
रत्नागिरी: तालुक्यातील चांदराई काजळी नदीतील गाळ काढण्याच्या कामात चालढकलपणा केला जात आहे. काही दिवसांपूर्वी काढलेला गाळी नदीच्या पात्रातच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. संबंधित विभागाकडूनही आज मशीन पाठवितो, उद्या मशीन पाठवितो, असे सांगून वेळ मारुन नेण्यात येत आहे. याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी विनंती एका निवेदनाद्वारे माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र झापडेकर यांनी केली. हे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना देण्यात आले आहे.
चांदेराई काजळी नदीतील गाळ काढण्याचे काम जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर असून प्रत्यक्ष गाळ काढण्यासाठी १२ एप्रिल २०२२ पासून सुरू करण्यात आले. आजपर्यंत फक्त तीन ते चार दिवसच काम झाले. उर्वरित दिवस डिझेल नाही व ड्रायव्हर नाही, म्हणून काम बंद ठेवले आहे. गाळ काढण्यासाठीचे मशीन नदीमध्ये उभे करुन ठेवले आहे. चालक नसल्यामुळे हे काम बंद आहे. याबाबत चिपळूण अलोरे येथील कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) श्री. बागेवाडी यांच्याकडे वारंवार संपर्क साधला होता. नदीतील सुमारे ९०० मीटर परिसरातील गाळ काढण्यासाठी २५ लाख रुपये मंजूर आहेत. हा गाळ एका मशिनने काढणे अशक्य आहे. त्यासाठी आणखीन मशिनरी पाठवून त्वरित गाळ उपसा करावा, अशी मागणी केली होती. त्यांच्याकडून ‘आज मशीन पाठवितो, उद्या मशीन पाठवितो, असे सांगून वेळ काढूपणा केला जात आहे. अजूनही कार्यवाही झालेली नाही.
नदीच्या पात्रातच गाळाचे मोठे ढीग
काम सुरु केल्यापासून तीन-चार दिवसांत जो गाळ उपसला आहे, तो नदीच्या पात्रातच मोठे ढीग मारुन ठेवला आहे. सध्या अचानक कधीही पाऊस पडू शकतो. जर पाऊस पडला तर ढिगामुळे नदीचे पात्र बदलून नदीचे पाणी या बाजारपेठेत व लोकांच्या घरात शिरुन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. याची गंभीर दखल घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी श्री. झापडेकर यांनी केली.
गाळ काढण्याचे काम वेळेत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये सध्याची स्थिती मांडण्यात आली आहे. वेळेत काम पूर्ण झाले नाही तर त्याचा परिणाम स्थानिक लोकांवर होणार आहे.
महेंद्र झापडेकर, माजी पंचायत समिती सदस्यजिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची झापडेकरांची मागणी; पुराचा धोका
तालुक्यातील चांदराई काजळी नदीतील गाळ काढण्याच्या कामात चालढकलपणा केला जात आहे. काही दिवसांपूर्वी काढलेला गाळी नदीच्या पात्रातच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. संबंधित विभागाकडूनही आज मशीन पाठवितो, उद्या मशीन पाठवितो, असे सांगून वेळ मारुन नेण्यात येत आहे. याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी विनंती एका निवेदनाद्वारे माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र झापडेकर यांनी केली. हे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना देण्यात आले आहे.
चांदेराई काजळी नदीतील गाळ काढण्याचे काम जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर असून प्रत्यक्ष गाळ काढण्यासाठी १२ एप्रिल २०२२ पासून सुरू करण्यात आले. आजपर्यंत फक्त तीन ते चार दिवसच काम झाले. उर्वरित दिवस डिझेल नाही व ड्रायव्हर नाही, म्हणून काम बंद ठेवले आहे. गाळ काढण्यासाठीचे मशीन नदीमध्ये उभे करुन ठेवले आहे. चालक नसल्यामुळे हे काम बंद आहे. याबाबत चिपळूण अलोरे येथील कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) श्री. बागेवाडी यांच्याकडे वारंवार संपर्क साधला होता. नदीतील सुमारे ९०० मीटर परिसरातील गाळ काढण्यासाठी २५ लाख रुपये मंजूर आहेत. हा गाळ एका मशिनने काढणे अशक्य आहे. त्यासाठी आणखीन मशिनरी पाठवून त्वरित गाळ उपसा करावा, अशी मागणी केली होती. त्यांच्याकडून ‘आज मशीन पाठवितो, उद्या मशीन पाठवितो, असे सांगून वेळ काढूपणा केला जात आहे. अजूनही कार्यवाही झालेली नाही.
नदीच्या पात्रातच गाळाचे मोठे ढीग
काम सुरु केल्यापासून तीन-चार दिवसांत जो गाळ उपसला आहे, तो नदीच्या पात्रातच मोठे ढीग मारुन ठेवला आहे. सध्या अचानक कधीही पाऊस पडू शकतो. जर पाऊस पडला तर ढिगामुळे नदीचे पात्र बदलून नदीचे पाणी या बाजारपेठेत व लोकांच्या घरात शिरुन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. याची गंभीर दखल घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी श्री. झापडेकर यांनी केली.
गाळ काढण्याचे काम वेळेत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये सध्याची स्थिती मांडण्यात आली आहे. वेळेत काम पूर्ण झाले नाही तर त्याचा परिणाम स्थानिक लोकांवर होणार आहे.
- महेंद्र झापडेकर, माजी पंचायत समिती सदस्य