esakal | रत्नागिरी विमानतळ उड्डाणासाठी तयार ;उदय सामंत
sakal

बोलून बातमी शोधा

airport

रत्नागिरी विमानतळ उड्डाणासाठी तयार ;उदय सामंत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : चिपी (जि. सिंधुदुर्ग) विमानतळाप्रमाणे रत्नागिरी विमानतळही उड्डाणासाठी तयार आहे. विमान पार्किंगसाठी लागणारी ५० एकर जागा मिळत नव्हती. परंतू आता धरम चव्हाण यांची जागा उपलब्ध झाली आहे. भाड्याने ही जागा घेऊन लवकरच पुढील प्रक्रिया केली जाईल. विमानांच्या नाईट लॅंडिगसाठीही ७० कोटीचा प्रस्ताव आम्ही शासनाला पाठवला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, चिपी विमानळाचे काम ज्या कंपनीने केले आहे, त्याच कंपनीने रत्नागिरी विमानतळाचे काम केले आहे. विमान पार्किंगसाठी ५० एकर जागा लागणार होती; मात्र ती जागाच मिळत नव्हती. धरम चव्हाण यांनी ५० एकर जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. विमान पार्किंगसाठी तुम्हीच ही जागा विकसित करून भाड्याने द्या, असा प्रस्ताव ठेवला होता; मात्र त्यांनी त्याला नकार दिला. शासनच आता ही जागा विकसित करून तेथे विमान पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी चव्हाण यांना योग्य ते भाडे दिले जाणार आहे.

तिवंडेवाडीत उभारली जाणार रडार यंत्रणा

सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाची असलेली रडार यंत्रणा बसवण्यासाठीही स्वतंत्र जागेची गरच आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू होता; मात्र तिवंडेवाडीतील ग्रामस्थ रडारसाठी जागा देण्यात तयार झाल्याने हा प्रश्नही सुटला आहे. विमानतळ भागातील ज्या ग्रामस्थांची जागा संपादित केली जाणार आहे, त्यांना रेडिरेकनरप्रमाणे दर देण्यात येणार आहे.सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाची असलेली रडार यंत्रणा बसवण्यासाठीही स्वतंत्र जागेची गरच आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू होता; मात्र तिवंडेवाडीतील ग्रामस्थ रडारसाठी जागा देण्यात तयार झाल्याने हा प्रश्नही सुटला आहे. विमानतळ भागातील ज्या ग्रामस्थांची जागा संपादित केली जाणार आहे, त्यांना रेडिरेकनरप्रमाणे दर देण्यात येणार आहे.

एक नजर

  1. रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण

  2. पहिली ११०० मिटरची धावपट्टी केली २ कि.मी. ची

  3. धावपट्टीची वाढवली उंची; चार्टर फ्लाईट उतरणार

  4. डोमेस्टिक महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे मागितली परवानगी

loading image
go to top