esakal | रत्नागिरीत चोवीस तासात अतिवृष्टी ; संगमेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

ratnagiri Average 92.71 cm rainfall recorded Most rainfall in Sangameshwar

जिल्ह्यातील नद्यांनी ओलांडणी धोक्याची पातळी

 सरासरी 92.71 मिमी पावसाची नोंद

रत्नागिरीत चोवीस तासात अतिवृष्टी ; संगमेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी :  गेल्या चोवीस तासात  जिल्ह्यामध्ये दापोली, लांजा, राजापूर वगळता  इतर सर्वत्र अतिवृष्टी झाली. संगमेश्वर मध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून  तेथे  142 .30 मिलिमीटर पाऊस झाला. 24 तासात सरासरी 92.71 मिमी तर एकूण 834.40 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. रात्री उशिरा आणि सकाळीही पावसाबरोबर सोसाट्याचा वारा सुटला होता. दोन ते तीन दिवस पावसाने उसंत खाल्ली होती. त्यामुळे नागरिक काहीसे बिनधास्त झाले होते. दैनंदिन व्यवहार आणि इतर कामांसाठी नागरिक बाहेर पडले होत. काल रात्रीपासून कोसळणार्‍या पावसाने पुन्हा दैनंदिन व्यवहारांची घडी विस्कटली. जिल्ह्यातील नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

हेही वाचा- रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला : चांदेराई बाजारपेठेत भरले पुराचे पाणी ... -

जगबुडी नदी, काजळी नदी आदींनी धोक्याची पातळी  ओलांडली  आहे. काही भागांमध्ये शहरात, गावांमध्ये पाणी शिरले आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथेही नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पाणी गावात शिरले आहे.रत्नागिरी शहरातील मांडवी येथील सदानंद वाडीमध्ये नागरिकांच्या घरापर्यंत पाणी आले आहे. गटाराचे पाणी या भागात साचून राहते. त्यात पावसाचे पाणी वाढल्याने तेथे पाणी भरले आहे.

हेही वाचा-दर्याला कोकणवासीयांची साद, काय मागीतलय मागणं? वाचा...

जवळच असलेल्या महादेव अपार्टमेंटपरिसरात पाणी भरले आहे. राजापूर, संगमेश्‍वर आदी भागात जोरदार पाऊस पडत असल्याने तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसाचा अजून कायम असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाटच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. समुद्राला उधाण असल्याने किनारी भागातील गावांनाही सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पडझड झाली आहे. 

हेही वाचा-रस्त्यात खड्डा, की खड्ड्यात रस्ता? ग्रामस्थांचा प्रश्न -

गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे

मंडणगड 102.30 मिमी,

दापोली 70.80,

खेड 98.60 मिमी,

गुहागर 110.60,

चिपळूण 83.60 मिमी,

संगमेश्वर 142.30 मिमी,

रत्नागिरी 33.30 मिमी,

राजापूर 60.30 मिमी,

लांजा 65.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

संपादन - अर्चना बनगे

loading image