सहकार पॅनेलच्या उमेदवारांचे चिन्ह कपबशी | Ratnagiri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 सहकार पॅनेलच्या उमेदवारांचे चिन्ह कपबशी

रत्नागिरी : सहकार पॅनेलच्या उमेदवारांचे चिन्ह कपबशी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या सातही उमेदवारांना कपबशी निशाणी मिळाली आहे. निशाणी वाटपासह उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सोपान शिंदे यांनी पूर्ण केली.

रत्नागिरी तालुका मतदारसंघातून गजानन पाटील यांना कपबशी, प्रल्हाद शेट्ये यांना मोटारगाडी, लांजा तालुका मतदारसंघातून आदेश आंबोळकर यांना कपबशी, महेश खामकर यांना नारळ, गुहागर तालुका मतदारसंघातून अनिल जोशी यांना कपबशी, चंद्रकांत बाईत यांना अंगठी, जिल्हास्तरीय दुग्धसंस्था मतदारसंघातून गणेश लाखण यांना कपबशी, अजित यशवंतराव यांना नारळ, विमुक्त जाती मतदारसंघातून सुरेश कांबळे यांना कपबशी, सचिन बाईत यांना अंगठी, नागरी सहकारी पतसंस्था मतदार संघातून संजय रेडीज यांना कपबशी, सुजित झिमण यांना ढाल-तलवार, मजूर मतदारसंघातून दिनकर मोहिते यांना कपबशी, राकेश जाधव यांना नारळ निशाणी देण्यात आली आहे.

सहकारच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गुरुवारी सात जागांवरील १४ उमेदवारांना निशाण्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात राहिलेल्या १४ उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहकार पॅनेलचे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. १९ ला मतदान आरडीसीसी बँकेच्या सात जागांसाठी १९ नोव्हेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर २१ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल.

एक दृष्टिक्षेप...

  • १४ उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध

  • सहकार पॅनेलचे १४ उमेदवार बिनविरोध

  • आरडीसीसी बँकेच्या सात जागांसाठी १९ ला मतदान

  • २१ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणी

loading image
go to top