रत्नागिरीत काँग्रेस `या` विरोधात आक्रमक ; कॉंग्रेसभवनसमोर धरणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले म्हणाले, ""30 जून ते 4 जुलै या सप्ताहात ब्लॉक व तालुकास्तरावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. संपूर्ण देशात कोरोनामुळे हाहाकार पसरलेला आहे.

रत्नागिरी -  केंद्राच्या अन्यायकारक इंधन दरवाढीविरोधात धरणे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी दोन तास धरणे आंदोलनही करण्यात आले. हे आंदोलन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसभवन येथे केले. पेट्रोल व डिझेलची अन्यायकारक दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. 

कॉंग्रेस भवन येथे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षित अंतर राखून, मास्क घालून हे आंदोलन केले. या मोहिमेबाबत जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले म्हणाले, ""30 जून ते 4 जुलै या सप्ताहात ब्लॉक व तालुकास्तरावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. संपूर्ण देशात कोरोनामुळे हाहाकार पसरलेला आहे.

20 कोटी रोजगार बुडालेले आहे. अर्थव्यवस्थेची परिस्थिती भयानक आहे. संपूर्ण जगात अर्थव्यवस्था ढासळेली असताना देशातील जनतेवर अन्यायकारक दरवाढ लादलेली आहे. कोविड 19 च्या परिस्थितीमुळे देशातील जनता हतबल आहे. या नवीन दरवाढीमुळे जनतेची परिस्थिती अधिक दयनीय झालेली आहे. ही दरवाढ केंद्र सरकारने मागे द्यावी म्हणून कॉंग्रेस पक्षातर्फे सरकारला विनंती केलेली आहे. इंधनवाढ मागे घेण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने देशव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

कॉंग्रेसतर्फे शहिदों को सलाम दिवस 
गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पित करणे व चीनच्या आगळीकीचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी (ता. 29) कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसभवन येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. शहीद जवानांना वंदन, भारताच्या सशस्त्र सैन्य दलाला समर्थन आणि चिनी सैन्याने हडपलेली भारतीय भूमी परत घेण्याची मागणी करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Congress Agitation Against Hike In Petrol Diesel Rate