रत्नागिरीः काळबादेवी किनारी सापडले खवल्या मांजर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

रत्नागिरी - शहराजवळील काळबादेवी किनारी सापडलेल्या दुर्मिळ खवल्या मांजराला तेथील ग्रामस्थांनी वन विभागाकडे सुपूर्द केले.

रत्नागिरी - शहराजवळील काळबादेवी किनारी सापडलेल्या दुर्मिळ खवल्या मांजराला तेथील ग्रामस्थांनी वन विभागाकडे सुपूर्द केले.

काळबादेवी येथील पारकर बिर्जेवाडी येथील द्वारका पारकर हे समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यांना समुद्राच्या पाण्यामध्ये खवल्या मांजर दिसले. त्यांनी तातडीने गावातील अमृत मयेकर यांच्यासह राजू पारकरना बोलावले. त्या तिघांनी पाण्यातील खवल्या मांजराला बाहेर काढून किनाऱ्यावर आणले. ही बाब पिंट्या भोळे यांनी वनविभागाला कळविली. वनअधिकारी डोईफोडे यांनी घटनास्थळी पथक पाठविले. ते मांजूर ताब्यात घेऊन सुरक्षित अधिवासात सोडण्याची व्यवस्था केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri : Crested cat found on the Kalbadevi coastline