संगमेश्वर : तालुक्यातील एका गावात काही दिवसांपूर्वी घरात एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) एका नराधमाने तोंड दाबून, तसेच दोन्ही हात पकडून जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. याबाबत बाहेर वाच्यता केलीस, तर तुला ठार मारून टाकेन, अशी धमकी पीडितेला दिल्याने ती घाबरली होती. त्यामुळे काही दिवसानंतर संगमेश्वर पोलिस ठाण्यात (Sangameshwar Police Station) तक्रार करण्यात आली.