बँक निवडणूक : सात जागांसाठी 14 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद : Ratnagiri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

voting

बँकेच्या एकवीसपैकी सहकार पॅनेलचे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले.

बँक निवडणूक : सात जागांसाठी 14 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: रत्नागिरी (Ratnagiri)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सात जागांसाठी १४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. दिवसभरात ८७.४५ टक्के मतदान झाले. २१ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजल्यापासून जिल्हा नगर वाचनालयाच्या दुसर्‍या मजल्यावर मतमोजणीला सुरवात होणार आहे. दोन तासात सर्व जागांची मतमोजणी पूर्ण होईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

जिल्ह्यात मतदानांसाठी नऊ केंद्र ठेवण्यात आली होती. सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली. बँकेच्या एकवीसपैकी सहकार पॅनेलचे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मंडणगड तालुक्यात ३६ पैकी ३४ (९४.४४ टक्के), दापोली- १०५ पैकी ९७ (९२.३८), खेड- १२९ पैकी ११५ (८९.१५), चिपळूण- २१६ पैकी १९० (८७.९६), गुहागर- ५६ पैकी ५२ (९२.८६), संगमेश्‍वर- १०५ पैकी ८७ (८२.८६), रत्नागिरी- १९२ पैकी १५३ (७९.६९), लांजा- ७२ पैकी ७० (९७.२२), राजापूर- ८५ पैकी ७३ (८५.८८) मतदान झाले. एकूण ९९६ पैकी ८७१ (८७.४५ टक्के) मतदान झाले आहे. लांजामध्ये सर्वाधिक, तर रत्नागिरी तालुक्यात सर्वात कमी मतदान झाले आहे.

हेही वाचा: विधानपरिषद निवडणुकीच्या भेटीत लोकसभेची तयारी ; हातकणंगलेतून राहूल आवाडे उमेदवार

जिल्हास्तरावर सर्व मतदान यंत्रे एकत्र करून मतमोजणीच्या ठिकाणी ठेवली आहेत. जिल्हा नगरवाचनालयाच्या मतदान केंद्राबाहेर संचालक दीपक पटवर्धन, रामचंद्र गराटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश शेवडे, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, भाजप तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे उपस्थित होते.

हे आहेत उमेदवार !

विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून सहकार पॅनेलचे सुरेश मारूती कांबळे विरूद्ध सचिन चंद्रकांत बाईत, मजूर संस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे दिनकर गणपत मोहिते विरूद्ध राकेश श्रीपत जाधव, नागरी पतसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे संजय राजाराम रेडीज विरूद्ध अ‍ॅड. सुजित भागोजी झिमण, दुग्धसंस्था मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गणेश यशवंत लाखण विरूद्ध अजित रमेश यशवंतराव, रत्नागिरी तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गजानन कमलाकर पाटील विरूद्ध प्रल्हाद महादेव शेट्ये, लांजा तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे आदेश दत्तात्रय आंबोळकर विरूद्ध महेश रवींद्र खामकर, गुहागर तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे अनिल विठ्ठल जोशी विरूद्ध चंद्रकांत धोंडू बाईत अशी लढत झाली आहे.

loading image
go to top