esakal | कोकणात पूरप्रवण, दरडग्रस्त भागात संचारबंदी
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणात पूरप्रवण, दरडग्रस्त भागात संचारबंदी

कोकणात पूरप्रवण, दरडग्रस्त भागात संचारबंदी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी : अतिवृष्टीच्या (heavy rain) इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी (ratnagiri district) जिल्ह्यात ११ आणि १२ जूनला जाहीर केलेली संचारबंदी (curfew) पूरप्रवण क्षेत्र व दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या क्षेत्रापुरतीच मर्यादित असणार आहे. त्यामुळे लागू केलेली संचारबंगी संपूर्ण जिल्ह्यात नाही असे स्पष्टीकरण रत्नागिरीचे जिल्हाधिकाऱ्यांनी आज दिले आहे. जिल्हयात 11 ते 12 जूनला अति मुसळधार पावसाची शक्यता असून पुर स्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज झाले आहे. समुद्र, खाडी, नदी किनार्‍यावरील पुरग्रस्त, दरडग्रस्त भागात प्रवासासाठी प्रतिबंध घातले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा: 'वाहन नामा' उलगडणार 'एसटी'चा इतिहास

जिल्ह्यात मागील चोविस तासात दुपारनंतर पावसाने सुरुवात केली आहे. हवामान विभागाकडून (indian meteorological department) जिल्ह्यात 11 ते 12 जूनसाठी ऑरेंज अलर्ट (orange alert) दिला आहे. या कालावधीत अति मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने गेले दोन दिवस आपत्कालासाठी तयारी केली आहे. यासंदर्भात तहसिल प्रशासनाला आदेशही काढले आहेत. त्यानुसार समुद्र, खाडी व नदी किनार्‍यावरील गावांसह चिपळूण, खेड व राजापूर पालिका परिसरात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. दरड कोसळण्याचीही शक्यता आहे. जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी पुरग्रस्त व दरडग्रस्त परिसरात पुढील दोन दिवस जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. जिल्ह्यात पुरग्रस्त 31 आणि दरडग्रस्त 45 ठिकाणे आहेत. रत्नागिरी शहरातील झाडगाव किनार्‍यांवरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. किनारी भागात भरतीच्यावेळी अजस्त्र लाटांचे तांडव पहायला मिळत आहे.

हेही वाचा: PHOTO - जाणून घ्या; मेथीची पाने खाण्याचे फायदे