रत्नागिरी जिल्ह्यात गेल्यावर्षीची तुलनेत सरासरी 1,616 मिमी कमी पावसाची नोंद 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

तेथे गतवर्षी 3812 मिमी पावसाची नोंद झालेली होती. गतवर्षी सर्वाधिक नोंद असलेल्या मंडणगड तालुक्‍यात यंदा 2309 मिमी पाऊस झाला असून तुलनेत 1700 मिमी कमी पाऊस झाला.

रत्नागिरी - मोसमी पावसाला परतीचे वेध लागले असून यंदा गतवर्षीपेक्षा जिल्ह्यात सरासरी पावसाची मोठी कमरता निर्माण झाली आहे. गतवर्षी 12 ऑक्‍टोबरपर्यंत सरासरी 4,301 मिमी नोंद झाली होती तर यंदा 1 जुनपासून आतापर्यंत सरासरी 2,685 मिलीमीटर पाऊस पडला. सुमारे 1,616 मिमी पाऊस कमी झाला आहे. 

गेल्या साडेचार महिन्यात यंदा संगमेश्‍वर तालुक्‍यात 3320 मिमी सर्वाधिक पाऊस झाला. मात्र तुलनेत 1200 मिमी कमी नोंद झाली होती. या तालुक्‍यात सर्वाधिक पावसाची नोंद दरवर्षी होत असते. त्यापाठोपाठ रत्नागिरी तालुक्‍यात 3183 पाऊस झाला. येथेही 1400 मिमीची तूट आहे. सर्वात कमी पाऊस दापोली तालुक्‍यात नोंदला गेला आहे.

तेथे गतवर्षी 3812 मिमी पावसाची नोंद झालेली होती. गतवर्षी सर्वाधिक नोंद असलेल्या मंडणगड तालुक्‍यात यंदा 2309 मिमी पाऊस झाला असून तुलनेत 1700 मिमी कमी पाऊस झाला.

सर्वच तालुक्‍यात बाराशे ते दोन हजार मिमी कमी पावसाची नोंद झाल्याने त्याचा परिणाम पाणी टंचाईवर होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानूसार 15 ऑक्‍टोबरपर्यंत मोसमी पाऊस परतेल. सध्या जोरदार पाऊस पडत असला तरीही सरासरी भरुन काढण्याएवढी नोंद झालेली नसल्याने भविष्यात चिंताजनक स्थिती निर्माण होऊ शकते. 

मोसमी पावसावर भात, नागली पिके अवलंबून असतात. यंदा जुनच्या सुरवातीला निसर्ग वादळाने तडाखा दिला. मोसमी पाऊस 9 जुनला कोकणात आला. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात भात पेरण्या सुरु झाल्या. पेरणी, लावणीही व्यवस्थित पार पडली. जिल्ह्यात 67 हजार हेक्‍टरवर भात तर 9 हजार हेक्‍टरवर नाचणी लागवड झाली. 

पावसाने सुरवातीपासून चांगली साथ दिली होती. पण परतीच्या पावसाने हळव्याच्या कापणीला त्रास झाला आहे. गरवे, निमगरवे भातावरही परिणाम होऊ शकतो. 
- संदीप कांबळे, शेतकरी 

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊस 
तालुका.......... 2020............ 2019 
मंडणगड........ 2309............ 4937 
दापोली.......... 1863............ 3812 
खेड.............. 2635............. 4714 
गुहागर......... 2796.............. 4222 
चिपळूण........ 2495............. 4397 
संगमेश्‍वर...... 3320.............. 4616 
रत्नागिरी........3183..............3616 
लांजा..............2803..............4263 
राजापूर......... 2736...............4130  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri District Recorded 1616 MM Less Average Rainfall Than Last Year