रत्नागिरी जिल्ह्याच्या भूजल पातळीत ०.१२ टक्‍के घट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

रत्नागिरी - हंगामातील कमी पावसाच्या नोंदीमुळे ऑक्‍टोबरमध्ये भूजल पातळीत घट झाली; मात्र नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने जानेवारीत पाणी पातळी वाढलेली होती. गेल्या तीन महिन्यांत थंडीपाठोपाठ वाढलेल्या उष्म्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. मार्च २०१९ मधील पाहणीत यंदा भूजल पातळी ०.१२ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यावर पाणीटंचाईत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

रत्नागिरी - हंगामातील कमी पावसाच्या नोंदीमुळे ऑक्‍टोबरमध्ये भूजल पातळीत घट झाली; मात्र नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने जानेवारीत पाणी पातळी वाढलेली होती. गेल्या तीन महिन्यांत थंडीपाठोपाठ वाढलेल्या उष्म्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. मार्च २०१९ मधील पाहणीत यंदा भूजल पातळी ०.१२ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यावर पाणीटंचाईत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

पाण्याच्या पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जातात. शिमगोत्सवात थंडीबरोबर पारा ३४ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत होता. त्यामुळे उन्हाचा कडाकाही तेवढाच जाणवला. मार्चअखेरीस त्यात भर पडली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रणरणत्या उन्हाने उष्माघाताची भीती वर्तविली जात आहे. दर चार महिन्यांनी भूजल विभागाकडून पाणी पातळीचे सर्वेक्षण होते. पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये, त्यानंतर जानेवारी आणि मार्चमध्ये होते. मार्चमधील ५३ विहिरींच्या तपासणींचा अहवाल भूजल विभागाकडे आला आहे. जानेवारीत पातळी वाढल्यामुळे यंदा प्रतिवर्षाप्रमाणे टॅंकरची सुरवात उशिराने झाली. त्या अहवालानुसार यंदा सर्वाधिक घट लांजा आणि दापोली तालुक्‍यात झाली आहे.

रत्नागिरी भूजल विभागाच्या सर्वेक्षणात जिल्ह्याची सरासरी पाणी पातळी ६.३१ मीटर आहे. गतवर्षी याचवेळी ती ६.२७ मीटर इतकी होती. २०१७ रोजी ६.१४ मीटर होती. तालुकानिहाय सरासरी पाणी पातळीत मंडणगड ३.५० मीटर, दापोली ४.७३ मीटर, खेड ४.१२, चिपळूण ४.८०, गुहागर ७.९२, संगमेश्‍वर ७.०८, रत्नागिरी ९.३३, लांजा ८.८७, राजापुरात ६.४४ मीटर आहे. मेअखेरीस पाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्‍यता आहे. लोकसभा निवडणुका सुरू असल्यामुळे टंचाई आराखड्यातील पाणी योजना दुरुस्तीची कामे रखडली आहेत. ती न झाल्याने टॅंकरवर भर द्यावा लागणार आहे. खासगी टॅंकरची संख्या वाढेल, अशी शक्‍यताही आहे.

तालुकावार पाणी पातळीतील घट टक्‍क्‍यांमध्ये
    तालुका            भूजल पातळी 
* मंडणगड             -०.१३
* दापोली              -०.२०
* खेड                 - ०.१८
* गुहागर               - ०.०५
* चिपळूण             - ०.०७
* संगमेश्‍वर             - ०.०८
* रत्नागिरी            - ०.१२
* लांजा               - ०.२०
* राजापूर               - ०.०३

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri districts ground water level decreased by 0.12 percent