रत्नागिरीत कचरा टाकण्याचे नाही भय

१२ ठिकाणी सीसीटीव्हीत कैद; ओळखण्यात अडचण, ६३ जणांना सुमारे ४० हजारांचा दंड
सीसीटीव्हीत कैद
सीसीटीव्हीत कैदsakal
Updated on

रत्नागिरी : शहरात रस्त्यावर कचरा टाकण्यापेक्षा तो कचराकुंडीत टाकावा, अशी पालिकेकडून सूचित करूनही तो टाकला जातो. पालिकेचे कर्मचारी रस्त्यावरील कचरा उचलताना दिसतात. शहर स्वच्छ ठेवणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असूनही असं घडताना दिसत नाही. म्हणून पालिकेने कचरा टाकणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी शहरातील बारा ठिकाणी सीसीटीव्ही लावले होते. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कंट्रोलिंग हे मोबाईलवर होत असल्यामुळे कचरा टाकणारी व्यक्ती अथवा गाडीचा नंबरही स्पष्ट दिसत नाही. तरीही गेल्या सहा महिन्यात पालिकेकडून ६३ जणांवर ३९ हजार ६९० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

कॅमेरे लावलेल्या ठिकाणी कचरा कमी प्रमाणात मिळत आहे. पालिकेने कचरा टाकण्याच्या ठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या होत्या. तरीदेखील रस्त्यावर नागरिक कचरा टाकत असताना दिसत आहेत. शहरात कंदिल लॉज, पऱ्याची आळी, झारणी रोड, आठवडा बाजार शौचालयाच्या मागे, मिरकरवाडा पोलिस चौकी, नवीन भाजी मार्केट, कोकणनगर स्वामी समर्थ बंगल्यासमोर, मजगाव शिवाजीनगर स्मशानभूमीसमोर, शिवाजी स्डेडियम पाठीमागे भाजीमार्केट समोर, कोकणनगर कदमवाडीसमोर, शिवाजी स्डेडियम मच्छीमार्केट आतमध्ये, झारणी रोड-मच्छीमार्केट आत अशा बारा ठिकाणी पालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.

रात्रीच्यावेळी कचरा टाकण्यासाठी वाहन घेऊन येणाऱे तसेच रात्री फेरफटका मारण्यासाठी रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत आहे. यामधून गेल्या सहा महिन्यात ६३ जणांवर कारवाई करण्यात आली

असून, त्यांच्याकडून ३९ हजार ६९० रुपयांची दंडात्मक कारवाई पालिकेने केली आहे; मात्र पालिकेतर्फे लावलेल्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कंट्रोलिंग हे मोबाईलवर होत आहे. त्यामुळे टाकण्यात येणारी व्यक्ती अथवा गाडीचा नंबरही स्पष्ट होत नसल्याची खंत पालिकेकडून व्यक्त करण्यात आली. शहरातील कंदील लॉज तसेच पऱ्याची आणि अन्य काही ठिकाणी कचरा कमी प्रमाणात मिळण्यास सुरवात झाली आहे. शहरात दिवसाचा २० टन कचरा घंटागाडीच्या माध्यमातून गोळा करून तो विघटनासाठी पाठवण्यात येत आहे. तेथे कचरा कमी प्रमाणात सध्यातरी मिळत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

चंपक मैदानातही

रत्नागिरी शहर ग्रामीण भागाला लागून आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर एमआयडीसी, नर्मदा सिमेंट, चंपक मैदान मिरजोळे रस्ता या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा व प्लास्टिक फिशव्या टाकण्यात येतात. त्यामुळे शहराचे सौंदर्य बिघडत आहे. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही होत आहे.

नागरिकांनी स्वच्छता राखावी

कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर प्रती १ हजार अथवा ५ हजारापर्यत दंड आकारण्यात येत आहे. आपली रत्नागिरी स्वच्छ असावे व त्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेचा विचार केला तर स्वच्छ, सुंदर रत्नागिरी पाहावयास मिळेल, असा विश्वास वाटतो. प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता राखावी, असे आवाहन पालिकेचे स्वच्छता निर्देशक संदेश कांबळे यांनी केले.

एक नजर..

दंडात्मक कारवाई ६३ जणांवर

दंड केला ३९ हजार ६९० रुपयांचा

कचरा टाकणाऱ्यांवर दंड प्रत्येकी १ हजार ५ हजार पर्यंत

एक दृष्टिक्षेप...

सीसीटीव्ही कंट्रोलिंग मोबाईलद्वारे

शहरातील १२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com