esakal | Ratnagiri : अतिक्रमणावर जप्तीचा उतारा
sakal

बोलून बातमी शोधा

ratnagiri

Ratnagiri : अतिक्रमणावर जप्तीचा उतारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शहरातील बाजारपेठ परिसरासह काही ठिकाणी फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यासाठी रत्नागिरी पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. फेरीवाल्यांकडील विक्रीच्या वस्तूऐवजी त्यांचे वजनकाटे जप्त करण्याची नवीन शक्कल लढवली. त्यामुळे वस्तू मोजून देणे शक्य झाले नाही.

गेल्या दोन दिवसांत पालिकेने आठ ते दहाजणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून पाचशे रुपयांप्रमाणे दंड वसूल केला आहे. गणेशोत्सवासाठी फळं, भाजीपाला यासह विविध आवश्यक साहित्यांच्या विक्रीसाठी अनेक फेरीवाले शहरात स्टॉल लावून बसतात. मारुतीमंदिर, जेलनाका, रामआळी, गोखले नाका, विठ्ठल मंदिर परिसरासह धनजीनाका येथे बऱ्‍यापैकी फेरीवाल्यांची गर्दी होते.

हातगाडीवरून फळं विकणारे रामआळी परिसरात जागा अडवून उभे राहत असल्याने वाहतूक कोंडी होते. पादचाऱ्‍यांना चालणेही कठीण होते. याबाबत नागरिकांकडूनच पालिकेकडे तक्रारी येत होत्या. जेलनाका परिसरात तर फेरीवाल्यांमुळे वाहनचालकांची मोठी गर्दी होत होती. शहरातील मुख्य मार्गावर ही परिस्थिती असल्यामुळे अपघात होण्याची शक्यतानाही नाकारता येत नव्हती. अनधिकृतरित्या स्टॉल लावणाऱ्‍यांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यासाठी दिवसातून तीनवेळा पालिकेची जप्तीची गाडी फिरवण्यास सुरवात केली आहे.

loading image
go to top