रत्नागिरीची तहान भागवायला रोजचा खर्च एक लाख

‘पानवल’कडे दुर्लक्षाची किंमत; उपायांच्या वल्गनाच
शीळ धरण
शीळ धरणsakal
Updated on: 

रत्नागिरी : शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी पालिकेला दिवसाला एक लाख रुपये, तर महिन्याला ३० लाख रुपये मोजावे लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यात शीळ धरणाच्या २५० अश्वशक्तीच्या तीन वीजपंपांचे बिल, जलशुद्धीकरण केंद्राचे बिल आणि शीळ धरणाचा ताबा असलेल्या पाटबंधारे विभागाला पाणी वापराच्या द्याव्या लागणाऱ्या पैशांचा समावेश आहे.

शहराला विनाखर्च ग्राव्हिटीने (नैसर्गिक उतार) पाणी देणारे पानवल धरण अजून दुर्लक्षित आहे. धरणाची आजची परिस्थिती अतिशय विदारक आहे. प्रचंड गळती असून ते गाळाने भरलेले आहे. शहराचा गेल्या पाच ते आठ वर्षांमध्ये मोठा विस्तार झाला आहे. त्यामुळे दिवसाला १२ एमएलडी ऐवजी आता २२ एमएलडी उचलले तरी शहरवासीयांची तहान भागत नाही. शहरात साडेनऊ हजार नळजोडणीधारक आहेत. वर्षाची पाणीपट्टी सुमारे साडेसहा कोटी आहे. मात्र गेल्यावर्षी पेक्षा यंदा सुधारित पाणी योजना झाल्यामुळे शहरातील पाणी वितरण व्यवस्था बरी आहे. शीळ धरणात मुबलक पाणी आहे. १५ जूनपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही,

असा होतो खर्च

  • शीळ जॅकवेलवरील तीन वीजपंप

  • जलशुद्धीकरण केंद्राचे वीजबिल

  • पाटबंधारेला महिन्याला साडेपाच लाख

  • एमआयडीसीला पाणी घेतल्याचे पैसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com