पहिला आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट रत्नागिरीकराचा

‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ जगभरातील विविध भाषांमध्ये होणार प्रदर्शित
 फैरोज अनवर माजगावकर
फैरोज अनवर माजगावकरsakla

रत्नागिरी: मर्चंट नेव्हीमध्ये गेली २२ वर्षे कॅप्टन असलेला रत्नागिरीचा सुपुत्र फैरोज अनवर माजगावकर चित्रपटाद्वारे मराठीचा झेंडा सातासमुद्रा पार रोवण्यास सज्ज झाला आहे. त्यांची पहिलीच निर्मिती असलेला ''अ व्हॅलेंटाईन्स डे'' हा मराठी चित्रपट मराठीसह इंग्रजी, स्पॅनिश अशा विविध भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.असा बहुमान मिळवणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे.

माजगावकर हे मूळचे रत्नागिरीचे आहेत. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीतच झालेल. ते सध्या रत्नागिरी जिल्हा फुटबॉल असोसिएशन, रत्नागिरी जिल्हा सुपरसेव्हन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांना गायन, मॉडेलिंगचा छंद आहे. महाविद्यालयात असताना अभिनयाची आवड होती; मात्र तत्कालीन परिस्थितीमुळे त्यांना पूर्णवेळ अभिनयाकडे वळता आले नाही. ''अ व्हॅलेंटाईन्स डे'' या आपल्या पहिल्या चित्रपट निर्मितीमध्ये ते आणि त्यांचा मुलगा अदीन माजगावकर महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

आपल्या पहिल्या चित्रपट निर्मितीबद्दल बोलताना ते म्हणाले, मी मर्चंट नेव्हीमध्ये वीस वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहे. कॅप्टन या सर्वोच्च पदावर काम केल्यानंतर काहीतरी वेगळे करण्याचा विचार करत होतो. यामुळे नवी इनिंग सुरू करताना चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला. मी कामाच्या निमित्ताने जगभ्रमंती केली आहे. माझा मित्रपरिवार जगभर पसरलेला आहे. यामुळे आपल्या मराठी मातीतला सिनेमा मला त्यांच्यापर्यंत न्यायचा आहे. ''अ व्हॅलेंटाईन्स डे'' चा विषय एकदम हटके आहे. हा विषय फक्त महाराष्ट्र नाही तर जागतिक पातळीवरील प्रेक्षकांपर्यंत पोहचायला हवा, अशी आमची इच्छा आहे. यामुळे आमचा ''अ व्हॅलेंटाईन्स डे'' हा चित्रपट मराठी, इंग्रजी, जगातील दुसऱ्या क्रमांकाची बोलीभाषा असलेल्या स्पॅनिशमध्ये तसेच बांग्लादेशी भाषेतही करण्याचा आम्ही निर्णय घेतला.

माझी गोल्डन स्ट्राईप्स एन्टरटेन्मेंट कंपनी आणि कियान फिल्म्स अँड एन्टरटेन्मेंट हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर सहयोगी निर्माते अनन्या फिल्म्स आहेत. लेखक, दिग्दर्शक अजित दिलीप पाटील आणि कार्यकारी निर्माते सोमनाथगिरी आहेत. या चित्रपटाचे उत्कंठावर्धक टीझर पोस्टर रिलिज करण्यात आले. या चित्रपटात मुख्य भूमिकेत मराठीतील बड्या अभिनेत्याचा समावेश आहे. तसेच या चित्रपटाच्या टेक्निकल टीममध्ये बॉलिवूड व इजिप्शियन फिल्म इंडस्ट्रीमधील लोकांचा समावेश आहे. चित्रपटाचे शूटिंग देशातील विविध शहरांसह कोकणात होणार असल्याचेही माजगावकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com