Gram Panchayat Results : ब्रेकिंग ; रत्नागिरीतील गोळप ग्रामपंचायतीवर शिवसेनेची बाजी

राजेश शेळके
Monday, 18 January 2021

बंडखोर उमेदवार मंगेश साळवी यांची एक जागा वगळता उर्वरित जागांवर पराभव झाला आहे

रत्नागिरी : तालुक्यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या गोळप ग्रामपंचायतीवर शिवसेनेने बाजी मारली आहे. याठिकाणी 15 जागांपैकी 13 जागा मिळून शिवसेनेने प्रतिष्ठेची केलेली ही ग्रामपंचायत ताब्यात घेतले आहे. बंडखोर उमेदवार मंगेश साळवी यांची एक जागा वगळता उर्वरित जागांवर पराभव झाला आहे. साळवी यांनी येथे मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरीतील बहुचर्चित गोळप ग्रामपंचायती वर शिवसेनेने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.

रत्नागिरीतील प्रतिष्ठित ग्रामपंचायत म्हणून गोळप ग्रामपंचायत प्रसिद्ध आहे. आधीपासुनच गोळपमध्ये  शिवसेनेची सत्ता होती. मात्र तेथे मंगेश साळवी यांनी बंडखोरी केली. पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात 15 बंडखोर उमेदवार उभे केले. भाजपने साळवी यांना पाठिंबा दिला.

शिवसेनेने पहिल्यांदा ग्रामपंचायतीसाठी मोठा मेळावा घेतला होता. या निवडणुकीत पूर्ण ताकद लावून संपूर्ण ग्रामपंचातींवर शिवसेनेने वर्चस्व मिळवले असुन संपूर्ण बंडखोरांना धोबीपछाड करत ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. 
 

हेही वाचा - Gram Panchayat Results : तालुक्यातील तीन पैकी दोन ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे तर एका ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व

 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratnagiri golap grampanyat election win by shiv sena in again in rantagiri