Gram Panchayat election : ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार; आरक्षणामध्ये बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri Gram Panchayat elections 273 Gram Panchayat Changes in Reservations konkan

Gram Panchayat election : ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार; आरक्षणामध्ये बदल

रत्नागिरी : जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांसह गेल्या वर्षीपासून ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचाही खोळंबा झाला आहे. गेल्या १० महिन्यांपासून जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासक सांभाळत आहेत. जिल्ह्यात गेल्या डिसेंबरपासून येणाऱ्‍या डिसेंबरपर्यंत वर्षभरात २७३ ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने त्यांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पालिकांच्या निवडणुकांसह ग्रामपंचायत निवडणुकाही लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात तब्बल २७३ ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरअखेरपर्यंत संपत असल्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम पावसाळ्यानंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.

यामध्ये २०२१-२२ व २०२२-२३ मधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत व प्रभाग रचना झालेली आहे. यातील डिसेंबर २०२१ मध्ये ५० ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने त्यावर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. २२३ ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत संपणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतर वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यामुळे...

जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांसह ग्रामपंचायतींवरही प्रशासक राज सुरू आहे. ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलला. त्यानंतर अतिवृष्टीच्या कारणामुळे कोकणातील निवडणुका पुढे गेल्या. राज्यात सत्तांतर झाल्यामुळे प्रभाग रचना व थेट सरपंच, नगराध्यक्ष निवडीचा निर्णय झाल्यामुळे प्रभाग रचना व आरक्षणामध्ये बदल अपेक्षित आहे.

तालुका ग्रामपंचायती

मंडणगड १६

दापोली ३४

खेड १७

चिपळूण ३३

गुहागर २६

रत्नागिरी ३३

संगमेश्वर ३९

लांजा ३४

राजापूर ४१

एकूण २७३

Web Title: Ratnagiri Gram Panchayat Elections 273 Gram Panchayat Changes In Reservations Konkan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..