Ratnagiri : इनोव्हेटिव्ह लीडिंग कॉलेज पुरस्कार फिनोलेक्स महाविद्यालयाला

या कार्यक्रमात २५० हून अधिक शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता
ratnagiri
ratnagiri sakal

रत्नागिरी : येथील फिनोलेक्स अॅकॅडमी या अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅशनल एज्युकेशनल एक्सलन्स अॅवॉर्ड अँड कॉन्फरन्स २०२१ मध्ये दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि प्लेसमेंटअंतर्गत महाराष्ट्रासाठीचा मोस्ट इनोव्हेटिव्ह अँड लीडिंग इंजिनीअरिंग कॉलेज हा पुरस्कार प्राप्त झाला.

या कार्यक्रमात २५० हून अधिक शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालयांनी सहभाग घेतला. परिषदेस इंजिनियस ब्युरोक्रॅटस, ग्लोबल लीडर, सीईओ आणि राजकारणी यांनी सन्मानित केले. हा सोहळा सोशल मीडिया आणि न्यूज साइटसच्या डिजिटल माध्यमांमधून सादर करण्यात आला. पुरस्कारच्या सर्वेक्षणासाठी महाविद्यालयाची मुलभूत माहिती, पायाभूत सुविधा, प्रशिक्षित शिक्षकवर्ग, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकास घडवण्यासाठी महाविद्यालयाकडून प्रयत्न, औद्योगिक क्षेत्राशी महाविद्यालयाचा संपर्क, संशोधन अभिमुखता आणि नोकरीतील संधी या गोष्टींचा विचार करण्यात आला.

फिनोलेक्स समूहाचे अध्यक्ष (कै.) पी. पी. छाब्रिया यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले हे महाविद्यालय कोकणामध्ये दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणासाठी ओळखली जाते. कोकणातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतीच्या अभियांत्रिकी शिक्षणाबरोबर व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकासाचे योग्य प्रशिक्षण प्रदान करून, नामांकित आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर ॲकॅडमीचा नेहमी कल राहिला आहे. महाविद्यालयास यापूर्वी राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषद (नॅक) कडून उत्कृष्ठ श्रेणी प्राप्त झालेले कोकणातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. या यशाबद्दल श्रीमती अरुणा कटारा व प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com