रत्नागिरी : शहरातील जिजामाता उद्यानामध्ये (Jijamata Park) छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) सर्वांत उंच पुतळा उभारण्यात आला आहे. उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांची ही संकल्पना आहे. त्यांच्या आणखी एका नव्या संकल्पनेतून छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनप्रवास १९ भित्तीशिल्पातून उलगडण्यात आला आहे. विशेष म्हणजे जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतलेल्या रत्नागिरीतील शिल्पकाराने ही देखणी आणि आकर्षक शिल्पं तयार केली आहेत. पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.