रत्नागिरी : नजीकच्या खेडशी येथील गौरव लॉजवर महिलांच्या देहविक्रीचा प्रकार उघड झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, त्याचा तपास सुरू आहे. मुली पुरविणारा आणखी एक संशयित फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. तो या मुलींना वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरवत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे महिलांची तस्करी (ह्युमन ट्रॅफिकिंग) सुरू आहे का, याचा तपासही सुरू केला आहे. या प्रकरणाच्या अगदी खोलात जाऊन तपास केला जाईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.