इंधन दरवाढिविरोधात शिवसेना आक्रमक 

ratnagiri lanja shivsena protest
ratnagiri lanja shivsena protest

लांजा -पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात लांजा तालुका आणि शहर शिवसेनेच्या वतीने आज लांजात बसस्थानकासमोर मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन जाहीर निषेध करण्यात आला.

केंद्र सरकारच्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. याचा निषेध करण्यासाठी आज लांजा तालुका शिवसेनेच्या वतीने लांजा तालुक्यातील भांबेड, देवधे, गवाणे आणि वाकेड या चार जिल्हा परिषद गटात जोरदार निदर्शने करण्यात आली. लांजा  शहरातही बसस्थानकासमोर जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. 

मोदी सरकारचा निषेध असो,  केंद्र सरकारचा निषेध असो, उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर दरवाढीविरोधात लांजा तहसीलदार समाधान गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

लांजा बसस्थानकासमोर करण्यात आलेल्या निषेध प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख संदीप दळवी, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगरसेवक स्वरूप गुरव, लहू कांबळे, लल्या कुरूप,  दूर्वा भाईशेटे, उपतालुका प्रमुख सुरेश करंबेळे, शहर सचिव प्रसाद भाईशेट्ये, विभाग संघटक रवी डोळस, महिला शहर संघटक छाया गांगण,  जि प सदस्या स्वरूपा साळवी, युवा सेनेचे राहुल शिंदे यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com