Drought Crisis: माणसांबरोबर पशुधनालाही दुष्काळाच्या झळा; चारा नियोजनाचे मोठे आव्हान

Livestock Fodder Crisis: अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस आणि खालावलेल्या भूजल पातळीचा परिणाम पशुधनावरही होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या उपलब्ध चारा पुढील चार महिन्यांसाठी पुरेसा असला, तरी उन्हाळ्यातील अखेरच्या दोन-तीन महिन्यांसाठी चारा उपलब्ध करण्याचे आव्हान उभे राहणार आहे.
Drought preparedness in Ratnagiri focuses on protecting fodder supplies and ensuring feed for livestock.

Drought preparedness in Ratnagiri focuses on protecting fodder supplies and ensuring feed for livestock.

esakal

Updated on: 

अल निनो वादळाच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊस कमी पडला आहे. खालावलेल्या भूजल पातळीमुळे भविष्यात पाणीटंचाईच्या संकटाची तीव्रता अधिक वाढणार आहे. त्याच्यातून, निर्माण होणार्‍या दुष्काळाच्या झळा माणसांप्रमाणे पशुधनालाही सहन कराव्या लागणार आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त स्थिती डोळ्यासमोर ठेवून जनावरांना पाण्यासोबत चार्‍या च्याही उपलब्धततेचे आतापासून नियोजनाची आवश्यकता आहे. कातळ सड्यावरील गवत आणि अन्य स्रोत याच्यातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पशुधनासाठी उपलब्ध असलेला चारा आगामी चार महिन्यांसाठी पुरेसा आहे. ओला चारा निर्मितीच्या प्रयत्नांना पाण्याभावी खीळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील अखेरच्या दोन-तीन महिन्यांसाठी चारा उपलब्ध करण्याचे अन् पशुधनाची भूक भागवण्याचे आव्हान शेतकर्‍यांसमोर खर्‍या अर्थाने राहणार आहे.

- राजेंद्र बाईत, राजापूर

कोकणच्या विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याला वैविध्यपूर्ण असा सडा परिसर लाभलेला आहे. या सडा परिसरामध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत उगवते. उन्हाळ्यामध्ये हे गवत सुकून जाते; मात्र, गुरांना वैरणासाठी सुकलेले गवतही उपयुक्त ठरते. असे असले तरी, सर्वसाधारणतः दिवाळीनंतर सातत्याने सड्यावर वणवे लागण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. या वणव्यांमध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी पडून सड्यावरील मुबलक प्रमाणातील गवत जळून खाक होऊन जाते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वणवे लागण्याच्या सातत्याने घटना घडल्यास सड्यावर सध्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले गवत भविष्यामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सड्यावरील गवताचे वणव्यापासून संरक्षण करणे वा गवत कापून भविष्यासाठी त्याचा साठा करून ठेवण्याच्यादृष्टीने शेतकर्‍यांमध्ये आतापासून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.

Loading content, please wait...