रत्नागिरी : खेडचे माजी नगराध्यक्ष खेडेकर सहा वर्षे अपात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 वैभव खेडेकर

रत्नागिरी : खेडचे माजी नगराध्यक्ष खेडेकर सहा वर्षे अपात्र

खेड: खेड नगरपरिषदेच्या कारभारात गैरवर्तन केल्या प्रकरणी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर सहा वर्षे अपात्र करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत. याबाबत तत्कालीन गटनेते प्रज्योत तोडकरी व अन्य आठ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची सुनावणी ११ ऑक्टोबर रोजी महिन्यात मंत्री शिंदे यांच्या समोर व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे पार पडली होती. नगरविकासमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार वैभव खेडेकर यांना महाराष्ट्र नगरपरिषदा,

नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५५ ब मधील तरतुदीनुसार ७ एप्रिलपासून ६ वर्षाचा कालावधी समाप्त होईपर्यंत नगरपरिषद सदस्य म्हणून निवडले जाण्यास अनर्ह ठरविण्यात आले आहे, मात्र रिट याचिका क्र.५५३९/२०२१ मध्ये .उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सदर आदेश वैभव खेडेकर यांना प्राप्त झाल्यापासून चार आठवड्याच्या कालावधीनंतर या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, असे म्हटले आहे. दरम्यान वैभव खेडेकर यांनी माध्यमांना पाठवलेल्या व्हिडीओमध्ये या निर्णयाच्या विरोधात लढत राहीन असे म्हटले आहे.

Web Title: Ratnagiri Mayor Khed Khedekar Disqualified Six Years

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top