हायवेग्रस्तांची बैठक ओरोस ऐवजी मुंबईला - प्रमोद जठार

हायवेग्रस्तांची बैठक ओरोस ऐवजी मुंबईला - प्रमोद जठार
Updated on: 

कणकवली - राष्ट्रीय महामार्ग बाधितांच्या प्रश्‍नांबाबत गुरुवारी (ता. ३०) ओरोस येथे होणारी बैठक आता मुंबई मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह 
राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी, भूसंपादन सचिव, तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाढवून मिळावा, यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत ओरोस येथे ३० नोव्हेंबरला बैठक होणार होती. मात्र, त्याच दिवशी मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसमवेत महत्वाची बैठक असल्याने, ओरोस येथील बैठक ३० नोव्हेंबर या दिवशीच दुपारी एक वाजता पाटील यांच्या दालनात होणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, भूसंपादन सचिव, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकामचे अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबदला वाढवून मिळविण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्तांनी अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती मांडलेल्या नाहीत. आज (ता. २९) सायंकाळपर्यंत जेवढ्या हरकती दाखल करता येतील, तेवढ्या कराव्यात जेणेकरून, या हरकतींवर मुंबईत होणाऱ्या बैठकीत तोडगा काढता येईल. मोबदला वाढवून मिळविता येईल याबाबत प्रयत्न होतील, अशी माहिती जठार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com