माजी नगराध्यक्षा संपदा वाघधरे अपात्र

रविंद्र साळवी
बुधवार, 21 मार्च 2018

लांजा - लांजा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा संपदा वाघधरे यांच्या अपात्रतेवर नगरविकास विभागाकडून शिक्‍कामोर्तब झाले. वाघधरे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले होते. त्याविरोधात वाघधरे यांनी नगरविकास खात्याकडे दाद मागून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती मिळविली होती. अनधिकृत बांधकामप्रकरण त्यांना भोवले आहे. या निर्णयामुळे वाघधरे यांचे नगरसेवकपद धोक्‍यात आले आहे.

लांजा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा संपदा वाघधरे यांना नगरसेवकपदावरून अपात्र ठरविण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी ४ मे २०१७ ला दिला होता. त्याविरोधात संपदा वाघधरे यांनी थेट नगरविकास राज्यमंत्र्यांकडे अपील केले होते. या अपिलामुळे नगरविकास विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे वाघधरे यांचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाल पूर्ण झाला.

नगराध्यक्षा वाघधरे यांचे पती योगेश वाघधरे यांनी नगरपंचायत हद्दीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. नगरपंचायतीचे तत्कालिन विरोधी पक्षनेते सुनील तथा राजू कुरूप आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी ही तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी संपदा वाघधरे यांना दोषी ठरवत त्यांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरविले होते. नगरपंचायत अधिनियम १९६५ चे कलम ४४/१/ ई अन्वये पोटकलम ३ च्या तरतुदीनुसार त्यांना नगरपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरविले. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. हा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश १६ मार्च २०१८ च्या नगरविकास विभागाच्या पत्रानुसार कायम ठेवला. नगरविकास राज्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला दिलेली स्थगिती उठविली आहे.

Web Title: Ratnagiri News Sampada waghadare Ineligible