Ratnagiri : पानवल धरणाला ५० टक्के गळती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panval Dam

रत्नागिरी : पानवल धरणाला ५० टक्के गळती

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाची दुरवस्था झाली आहे. धरणाला ४० ते ५० टक्के गळती लागल्याची धक्कादायक माहिती पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुढे आली आहे. धरणाच्या दुरुस्तीचा ठराव करून पाटबंधारे विभागा याचा प्रस्ताव तयार करणार आहे. मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून या धरणाच्या दुरुस्तीला भरीव निधीची मागणी करू, असे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी सांगितले. सभागृहात एकमताने तसा ठराव आज घेण्यात आला.

शहराला नैसर्गिक उताराने (ग्रॅव्हिटी) पाणीपुरवठा करणारे हे एकमेव धरण आहे. शिळ धऱणापाठोपाठ शहराला पाणीपुरवठा करणारे हे दुसरे धरण आहे. पावसाळा आणि निम्म्या उन्हाळ्यात शहराला पाणीपुरवठा करण्यामध्ये या धरणाचा मोठा वाटा आहे. शिळ धरणाचा पाणीसाठा त्यामुळे काही महिने स्थिर राहातो. धरण बांधल्यापासून आजपर्यंत पानवल धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही किंवा त्याची मोठी दुरुस्तीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता या धऱणाला सुमारे ५० टक्के गळती लागली असल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी आजच्या सर्वसाधारण सभेत दिली. यापूर्वी या धऱणाची मुख्य जलवाहिनी बदलण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे २५ ते ३० लाखाहून अधिक खर्च करण्यात आला आहे. धरणाची दुरुस्ती झाली तर ठीक नाही तर जलवाहिनीचा काहीच फायदा होणार नाही. हा खर्च फुकट जाईल, असे साळवी यांनी स्पष्ट केले.त्यामुळे लवकरच पानवल धऱणाच्या दुरुस्तीच्यादृष्टीने पावले टाकली जाणार आहेत.

हेही वाचा: 'अंगारकी'ला गणपतीपुळेत सुमारे 40 हजार भाविकांनी लावली हजेरी

दुरुस्तीला पाटील भरीव निधी देतील

पानवल धरणाच्या दुरुस्तीचा आज ठराव घेऊन तो पाटबंधारे विभागाला देऊ. पाटबंधारे विभाग या धरणाच्या दुरुस्तीचा आराखडा तयार करून देईल. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्याकडे धरणाच्या दुरुस्तीबाबत चर्चा करू. त्यांच्यामार्फत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना हा प्रस्ताव सादर केल्यास पानवल धऱणाच्या दुरुस्तीला ते भरीव निधी देतील, असे साळवी म्हणाले. सर्वानुमते याला सहमती दर्शवण्यात आली आहे.

loading image
go to top