कोकणातील फळांचा दर्जा आता वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fruit

कोकणातील फळांचा दर्जा आता वाढणार

दाभोळ - कोकणात काजू बोंडसारख्या प्रक्रियेअभावी वाया जाणाऱ्या फळांचा दर्जा वाढावा, यासाठी काजू बोंडापासून बनविल्या जाणाऱ्या मद्याची वर्गवारी आता थेट विदेशी मद्य अशी होणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे कोकणातील नाशवंत होणाऱ्या आंबा, फणस, चिकू, जांभूळ, करवंद आदी फळांचाही दर्जा वाढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस संदीप राजपुरे यांनी दिली.

हंगामात प्रक्रियेअभावी वाया जाणाऱ्या या कोकणातील फळांना दर्जा प्राप्त व्हावा आणि यापासून फेणी, मद्य, हुराक तयार करण्यासाठी राज्य शासनाची मान्यता मिळावी, यासाठी दापोली येथील संदीप राजपुरे यांनी खासदार सुनील तटकरे, कदम, राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांची भेट घेतली होती. या वेळी राजपुरे यांनी शरद पवार यांच्याशी अर्धा तास चर्चा करून कोकणातील शेतकऱ्यांची उन्नती आणि रोजगार वाढीबाबत वाईन उद्योगाला परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. या वेळी पवार यांनी या वाईन उद्योगाला परवानगी देण्याबाबत शब्द दिला होता. त्यानंतर राजपुरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खेड दौऱ्यात भेट घेऊन याबाबत त्यांच्याशी चर्चा केली होती. या वेळी अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा करून तत्काळ निर्णय घेऊ, अशी माहिती दिली होती. त्यानंतर राजपुरे यांनी मंत्रालयात जाऊन येथील उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त उमाप यांच्याशी चर्चा केली होती व त्यांच्याकडूनही या उद्योगाबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती देण्यात आली होती.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाईन उद्योगाला चालना मिळावी, यासाठी मंजुरी दिली आहे. कोकणात वाईन उद्योगाला परवानगी घेण्यासाठी ज्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, त्याचीही माहिती राजपुरे यांनी घेतली आहे.

फळे प्रक्रिया न केल्याने वाया...

कोकणात दरवर्षी हंगामाच्या शेवटी काजू बोंड, आंबा, करवंद, जांभूळ, चिकू, फणस आदी लाखो टन फळे प्रक्रिया न केल्याने वाया जातात. या फळांना दर्जा प्राप्त व्हावा, म्हणून राजपुरे यांनी शेतकऱ्यांची इतकी वर्षांची मागणी लक्षात घेऊन शरद पवार यांच्याकडे मागणी लावून धरली होती.

Web Title: Ratnagiri Quality Of Kokan Fruit Will Increase

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top