esakal | बनावट वेबसाइटद्वारे भरतीची जाहिरात
sakal

बोलून बातमी शोधा

ratnagiri

Ratnagiri : बनावट वेबसाइटद्वारे भरतीची जाहिरात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्न्मंेट ऑफ महाराष्ट्र या नावाने बनावट वेबसाइट तयार करून त्याद्वारे आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. या माध्यमातून राज्यभरातील तरुणांना गंडा घालण्याचा प्रयत्न झाला असून, यावर उमेदवारांनी अर्ज करू नयेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले यांनी केले आहे. २०१९ मध्ये ज्यांनी अधिकृत वेबसाइटवर अर्ज दाखल केले होते, त्यांची लेखी परीक्षा १६ व १७ ऑक्टोबरला रत्नागिरीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात सायबर गुन्हेगारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामध्ये सरकारी यंत्रणेमार्फत होणाऱ्‍या भरत्या, अधिकाऱ्‍यांची फेसबुक अकाऊंट हॅक करून त्याद्वारे पैसे लाटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. सध्या सरकारी खात्यातील नोकर भरत्यांचे अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातात. पैसेही तसेच भरून घेण्यात येत आहेत. याचाच गैरफायदा घेऊन गंडा घालण्यासाठीचे प्रयत्न होऊ लागले आहेत.

बनावट वेबसाइट तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली जाते आणि त्या वेबसाइटवर शासनाच्या विविध खात्यांच्या भरती प्रक्रिया होत असल्याची खोटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. त्यावरून ऑनलाइन पेमेंट केल्यास आपसूक पैसे मिळतात. नोकरीच्या गरजेमुळे अनेक तरुण त्याला बळी पडू शकतात. सध्या आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात अशीच बनावट वेबसाइट बनविण्यात आल्याचे पुढे आले आहे. ‘रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्न्मंेट ऑफ महाराष्ट्र’ या फेक खात्याचा वापर करण्यात आला आहे.

ग्रामविकास मंत्रालयाकडून जिल्हा परिषद आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया २०१९ साली घेण्यात आली. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्या पेजवर दिलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रिक्त जागांची संख्या चुकीची आहे. जिल्ह्यात ८८ जागा रिक्त दाखवल्या आहेत. अन्य जिल्ह्यांचीही स्थिती तीच होती. प्रत्यक्षातील जागा वेगळ्याच आहेत. २०१९ च्या खऱ्‍या भरतीसंदर्भातील परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर झाले आहे.

फेक वेबसाइटची शासनाकडून दखल

याबाबत डॉ. आठल्ये म्हणाले, अधिकृत वेबसाइटवर अर्ज दाखल केलेल्यांची लेखी परीक्षा १६ व १७ ऑक्टोबरला रत्नागिरीत होणार आहेत. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी १, आरोग्य सेवक- पुरुष-१७, आरोग्य सेवक फवारणी (हंगामी) ४६, एएनएम १२६, औषध निर्माता २५ जागा रिक्त आहेत. फेक वेबसाइटची शासनाने दखल घेतली आहे.

loading image
go to top