रत्नागिरी : उद्योगांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरा

जिल्ह्यात उद्योग यावेत म्हणून समाज माध्यमापुरता पाठिंबा पुरेसा नाही
Kokan
Kokansakal

रत्नागिरी : रिफायनरीबाबत उद्योजकांची भूमिका काय असली पाहिजे, याचे आत्मचिंतन व्हावे. उद्योगमंत्री म्हणून मला असे वाटते की रिफायनरी किंवा कोणताही उद्योग हवा असेल तर मनापासून समर्थनार्थ रस्त्यावर उतरले पाहिजे. परंतु हे लोक व्हॉटस्‌अपवर आहेत आणि उद्योग नको म्हणणारे रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहेत.

जोपर्यंत कोकणात उद्योग हवे, असे म्हणणारे रस्त्यावर येत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही उद्योगाला समर्थन मिळणार नाही. महाराष्ट्रात जिथे जिथे उद्योगांना विरोध होत आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने थेट रस्त्यावर उतरले पाहिजे. कारण उद्योग आला की मोठ्या प्रमाणात सूक्ष्म, लघू उद्योग किती मोठ्या प्रमाणावर वाढते, हे आपणा सर्वांना माहिती आहे. असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयाच्या उद्‌घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले, ‘लोटे एमआयडीसी, रत्नागिरीतही एमआयडीसीमध्ये अनेक प्रकल्प बंद आहेत, याचा अभ्यास करायला हवा आहे. उद्योग बंद करण्याची मालकाची मानसिकता का होते. स्थानिक, राज्य व केंद्र पातळीवरील काही कारणे असतील तर उद्योग विभागाने उत्तर शोधले पाहिजे. असे झाले तर वेदांतापेक्षाही जास्त रोजगार महाराष्ट्र उपलब्ध होतील.’

प्रदूषणविरहित कारखाना

सामंत यांनी सांगितले, रत्नागिरी जिल्ह्यासाठी मी मरीन पार्क, मॅंगो पार्क, लॉजिस्टिक पार्क दोन दिवसांत मंजूर केला. पण आमच्याकडे जमिनीचा प्रश्न आहे. १९९२ मध्ये रत्नागिरीत अनिल अगरवाल यांच्या स्टरलाईटने रत्नागिरीत साडेसहाशे एकर जागा संपादन केली. रत्नागिरीकरांनी उठाव केला. तो राग धरून अगरवाल ही जागा सोडायला तयार नाहीत. १२ ला उच्च न्यायालयात तारीख आहे. गेल्या साडेसात वर्षांत तारीख लागली नाही, वकील देऊ शकलो नाही. हा नाकर्तेपणा आहे.

३५ वर्षे उद्योग न करता अशा जागा अडवून ठेवल्या तर स्थानिकांनी करायचे काय, हे आम्ही न्यायालयात पटवून देतोय. १२ किंवा १३ ला जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम ठेवील. आम्ही सर्व कागदपत्रे देत आहोत. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जायचीसुद्धा तयारी केली आहे. उद्योग विभागाकडे ही खाती आली की असे झाले तर पुढील सहा महिन्यात या साडेसहाशे एकर जागेवर प्रदूषण विरहित कारखाना आणू, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com