रत्नागिरी : खारे पाणी शेतीत; जलस्रोतही बाधित! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 जलस्रोतही बाधित

रत्नागिरी : खारे पाणी शेतीत; जलस्रोतही बाधित!

पावस : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी-ब्राह्मणवाडी परिसरातील खारलॅण्ड बंधाऱ्याची झडपे तोडण्यात आल्याने खारे पाणी मोठ्या प्रमाणात जात आहे. त्यामुळे परिसरातील विहिरीचे पाणी खारट झाले असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तातडीने झडपे बसवण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.

या परिसरात खाडीचे पाणी जात असल्यामुळे तो परिसर नापिक बनला; परंतु खारभूमी विभागाने या ठिकाणी बंधारा बांधल्यामुळे या भागातील जमीन सुपीक बनली होती व बेचव असलेले विहिरीचे पाणी पुन्हा चांगल्या तऱ्हेने उपयोगात येऊ लागले होते; परंतु काही मच्छीमारांनी आपल्या व्यवसायासाठी बंधाऱ्यावर खारे पाणी थांबविण्यासाठी टाकण्यात आलेली झडपे वारंवार तोडत असल्याने खाडीचे खारे पाणी व मच्छी मोठ्या प्रमाणात या परिसरात जात आहे. त्यामुळे या भागातील विहिरीचे पाणी खारट होत आहे. तसेच येथील नागरिकांना दुसऱ्या भागातून पिण्याचे पाणी आणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या लोकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहेत.

दोन वर्षांपूर्वी संबंधित खारभूमी अधिकारी यांनी आमदार उदय सामंत यांच्या निधीतून झडपे बसवण्याचे काम केले होते. त्यामुळे खारे पाणी बंद झाले होते; परंतु मासेमारीसाठी ही झडपे पुन्हा झडपे तोडण्यात आली.

या परिसरामध्ये पाच ते सहा एकरमध्ये खारे पाणी जात असून या भागात १५ ते २० घरे लगत असल्याने त्यांच्या विहिरीचे पाणी खारट झाले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी अन्य ठिकाणी जावे लागत आहे. दोन वर्षांपूर्वी संबंधित खारभूमी विभागाने आमदार उदय सामंत यांच्या निधीतून झडपे बसविण्याचे काम केले होते. त्यामुळे खारे पाणी बंद झाले होते. परंतु मासेमारीच्या माध्यमातून पुन्हा एकदा झडपे तोडण्यात आली आहेत.

झडपे तोडण्याच्या प्रकाराबाबत आम्ही सर्व बाधित लोक संबंधित खारभूमी अधिकारी व दुरुस्ती करिता लागणाऱ्या निधीसाठी आमदार उदय सामंत यांना भेटणार आहोत. वारंवार झडपे तोडण्याच्या प्रकाराबाबत त्यांचे लक्ष वेधणार आहोत.

- प्रशांत फडके, बाधित शेतकरी

Web Title: Ratnagiri Salt Water Farming Water Sources Disrupted

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top