Students in Ratnagiri, Rajapur and Sangameshwar will receive a complete waiver of Class 10 and Class 12 examination fees.
esakal
रत्नागिरी: राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांतील विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासननिर्णयानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील तीन दुष्काळी तालुक्यांतील तब्बल १० हजार २३९ विद्यार्थ्यांना दहावी-बारावीच्या परीक्षाशुल्कातून पूर्ण सूट मिळणार आहे. २६५ दुष्काळी तालुक्यांत निर्णय लागू.