रत्नागिरी - तालुक्यात लवकरच औद्योगिक क्रांती होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रयत्नांना यश आले असून, रिळ-उंडी येथे संरक्षण विभागाचा रणगाडे बनवणारा एक कारखाना, निवेंडीत मॅंगो आणि कॅश्यू पार्क तर वाटद यथे अंबानी ग्रुपचा डिफेन्स क्लस्टर असे प्रदूषणविरहित तीन प्रकल्प होणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाच दिवसांचा सर्व्हे संबंधित एजन्सीने केले आहेत. या उद्योगांना लागणाऱ्या जमिनीचे संपादन अंतिम टप्प्यात आहे. ४५ लाख एकर याप्रमाणे जमिनीला दर दिला जाणार आहे.