रत्नागिरी : धुंदरेतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

कचरा प्रकल्पाला विरोध; लांजा नगरपंचायतीला निवेदन
धुंदरेतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
धुंदरेतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशाराsakal

लांजा: नगरपंचायतीचा कचराप्रश्न चांगलाच ऐरणीवर आला असून, कचरा टाकण्यास किंवा डम्पिंग ग्राऊंड प्रकल्प करण्यास धुंदरे वांजुदेवी परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. याबाबत लांजा नगरपंचायतीला निवेदन सादर करण्यात आले. धुंदरे वांजुदेवी परिसरात डम्पिंग ग्राऊंड प्रकल्प करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल. प्रसंगी जनआंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

लांजा नगरपंचायतीचा कचराप्रश्न सध्या चांगलाच पेटला आहे. कचरा टाकण्यास नगरपंचायतीकडे स्वतःची जागा नसल्याने आणि भाडेतत्त्वावर घेतलेल्या धुंदरे येथील जागेला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. यामुळे नगरपंचायतसमोर कचऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून नगरपंचायतीच्या घंटागाड्याही प्रभागांमध्ये फिरलेल्या नाहीत.

यामुळे धुंदरे वांजुदेवी परिसरातील नागरिकांनी नगरपंचायतीला निवेदन दिले आहे. धुंदरे वांजुदेवी परिसरात ज्या चिरेखाणी आहेत, त्यांचा वापर नगरपंचायत घनकचरा टाकण्यासाठी करणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. या जागेपासून १०० फुटांवर देवीचे मंदिर आहे. तसेच ५० फुटांवर आम्ही श्री वांजुदेवीच्या ठिकाणांमध्ये वाघबारस करतो. तसेच या जागेपासून शंभर फुटांवर बारमाही वाहणारी नदी आहे. तिचे पाणी नगरपंचायतीच्या नळपाणी योजनेसाठी वापरले जाते. नगरपंचायत प्रभाग क्रमांक एक हाच घनकचरा प्रकल्पाला का दिसतो? लांजा नगरपंचायतीमार्फत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com