esakal | Ratnagiri : खेडमधील किल्ल्यांचे संवर्धन करणार कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

khed

Ratnagiri : खेडमधील किल्ल्यांचे संवर्धन करणार कोण?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खेड : खेड तालुक्यातील किल्ले संवर्धनाची जबाबदारी कुणाची, असा उपरोधिक सवाल सह्याद्री प्रतिष्ठान रसाळगड किल्ला समितीचे अध्यक्ष वैभव विष्णू सागवेकर यांनी सकाळकडे व्यक्त केला आहे. तालुक्यात अनेक किल्ले आहेत, पण त्याकडे राज्य सरकार व पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे, अशी खंत त्यानी बोलून दाखवली.

ते म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकच्या वेळी तीन हजार सातशे गडकोट राज्यात होते,आज ते किल्ले महाराष्ट्रात सर्वत्र विखुरले गेले आहेत,महाराष्ट्रामधील ४०० किल्यापैकी राज्य पुरातत्व विभागात फक्त ४६ किल्याची यादी आहे, पण किल्ले रसाळगड सुमारगड महिपतगड असे अनेक किल्ले खेड तालुक्यात आहेत. त्या किल्यांची जवाबदारी कोणाची.गडकिल्ले संवर्धनसाठी आपण काय उपाययोजना करू शकतो, स्थानिक आमदार खासदार यांनी या किल्ल्याकडे आवर्जून लक्ष द्यावे. किल्याच्या आधारे शिवरायांनी परकी आक्रमण पचवून सत्ताधारी लोकांना नामोहरम केले होते,मात्र काळाच्या ओधात या किल्यांची पडझड सुरू आहे. सह्याद्री प्रतिष्ठान सोबत इतरही संस्था आहेत त्यांना पाठबळ दिले पाहिजे.

गडावरील प्रत्येक दगड पवित्र

गडावरील प्रत्येक दगड आपल्यासाठी पवित्र आहे. या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी काम कशा पध्दतीने केले पाहिजे, याचा विचार केला पाहिजे, गडकिल्ल्यांच्या आतील भागांची मोडतोड झाली आहे. पुरातत्त्व विभागाला माहिती देऊन काहीही उपयोग होताना दिसत नाही. अनेक वेळा गडकिल्याच्या बातम्या व्हायरल होतात, जगभरातील लोक त्या पाहतात,त्यांने लोक फक्त जागरूक होतात, पण संवर्धनात प्रगती वा ऊपयोग शून्य, असेही सागवेकर यानी सांगितले.

loading image
go to top