शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी; प्रतिष्ठितांची मोर्चेबांधणी

शिवसेना-भाजप युती झाल्यापासून हा जिल्हा परिषद गट सेनेच्या वाट्याला आला
इच्छुकांची मोर्चेबांधणी
इच्छुकांची मोर्चेबांधणीsakal
Updated on

पावस : रत्नागिरी तालुक्यातील गोळप जिल्हा परिषद गट सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्यामुळे शिवसेनेतर्फे इच्छुकांची भाऊगर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वरिष्ठ पातळीवर कोणता निर्णय होणार व कोणाची वर्णी लागणार, यावर सर्व गणिते अवलंबून असून, भाजपच्या गटामध्ये अद्यापही शांतता आहे. कारण या गटामध्ये सातत्याने शिवसेनेचे वर्चस्व अबाधित आहे.

शिवसेना-भाजप युती झाल्यापासून हा जिल्हा परिषद गट सेनेच्या वाट्याला आला होता. त्यामुळे या गटावर सातत्याने सेनेचे वर्चस्व राहिले आहे, परंतु भाजपला या गटांमध्ये अद्यापही वर्चस्व निर्माण करता आले नाही. त्यामुळे भाजपचे स्थान नगण्य आहे. या प्रकरणांमध्ये सातत्याने सेनेचेच वर्चस्व अबाधित राहिले. त्याला गेली सात-आठ वर्षे आमदार गटाचा पाठिंबा कारणीभूत आहे. त्यामुळे विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारांचा ओढा शिवसेनेकडे झाला आहे.

मागील निवडणुकीत हा गट महिला ओबीसी गटासाठी राखीव झाल्यामुळे या खेपेस हा गट सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्यामुळे या गटामध्ये शिक्षकांची भाऊगर्दी होणार आहे. प्रत्येक उमेदवाराचे आपले वेगळे वर्चस्व राजकारणावर असल्यामुळे या खेपेस प्रत्येकजण आपले घोडे पुढे देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे चित्र दिसत आहे. या गटामध्ये या खेपेला दिग्गज नेते इच्छुक आहेत.

विद्यमान सदस्य मानसी मंगेश साळवी यांचा आरक्षणामुळे पत्ता कट झाल्याने त्यांचे पती मंगेश शंकर साळवी यांनी या वेळेला आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी खासदार विनायक राऊत यांच्याकडे मोर्चेबांधणीस सुरवात केली आहे. मागील वेळेस साळवी यांच्या पत्नीस आमदारांच्या मागणीला डावलून उमेदवारी दिली होती. त्यामुळे आता आरक्षण पडल्याने आपण निष्ठावंत शिवसैनिक असल्याने उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर गेली दोन वर्षे गोळप विभागप्रमुख असलेले नंदा मुरकर हे अनेक वर्ष निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करीत असताना या गटांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे करताना प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक शाखाप्रमुख व ग्रामस्थ सातत्याने त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. त्यांना कार्यकर्त्यांचा चांगला पाठिंबा आहे.

नेताजी पाटील यांच्याकडून तयारी...

आमदार सामंत यांचे सचिव नेताजी पाटील यांचे विविध विकासकामांच्या माध्यमातून प्रत्येक वाडीवस्तीवर थेट संबंध असल्याने तेही या गटातून इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे या गटांमध्ये प्रतिष्ठित नेतेमंडळी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने कोणाची वर्णी लागते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

नेताजी पाटील यांच्याकडून तयारी...

आमदार सामंत यांचे सचिव नेताजी पाटील यांचे विविध विकासकामांच्या माध्यमातून प्रत्येक वाडीवस्तीवर थेट संबंध असल्याने तेही या गटातून इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे या गटांमध्ये प्रतिष्ठित नेतेमंडळी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने कोणाची वर्णी लागते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com