रत्नागिरी जिल्हा परिषदेत 'हे' झाले सभापती  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri ZP Sabhapati Election without Oppose Marathi News

जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात ही निवड प्रक्रिया झाली. सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल होण्याची मुदत सुरु झाली. तत्पूर्वी सभापतीपदाचे उमेदवार ठरविण्यासाठी टीआरपी येथील जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थानी बैठक झाली.

 रत्नागिरी जिल्हा परिषदेत 'हे' झाले सभापती 

रत्नागिरी - जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड प्रक्रिया मंगळवारी (ता. 14) बिनविरोध झाली. अपेक्षेप्रमाणे रत्नागिरी तालुक्‍याला बांधकाम व आरोग्य आणि समाजकल्याण सभापतीपद मिळाले. संगमेश्‍वर तालुक्‍याला संगमेश्‍वर तालुक्‍याला महिला व बालकल्याण समिती तर खेडच्या सुनील मोरे यांना शिक्षण व अर्थ समिती यांची वर्णी लागली.

जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात ही निवड प्रक्रिया झाली. सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल होण्याची मुदत सुरु झाली. तत्पूर्वी सभापतीपदाचे उमेदवार ठरविण्यासाठी टीआरपी येथील जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थानी बैठक झाली. यावेळी संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, शिवसेना गटनेते उदय बने यांच्यासह सर्व जिल्हापरिषद सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांची येथे होणार हकालपट्टी

या बैठकीत बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदी महेश उर्फ बाबू म्हाप, शिक्षण व अर्थ समिती सभापतीपदी सुनील मोरे तर समाजकल्याण सभापतीपदी ऋतुजा जाधव आणि महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी संगमेश्वरच्या रजनी चिंगळे यांची नावे जाहीर करण्यात आली. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यात आला. दुपारी 3 वाजता उमेदवारी अर्जांची छाननी झाली आणि एकच अर्ज असल्यामुळे त्यांना बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 39 सदस्य असून राष्ट्रवादीचे 15 सदस्य आहेत. राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे निवडणुक बिनविरोध होणार हे अपेक्षित होते. त्याप्रमाणे निवडणुक प्रक्रिया झाली.

हेही वाचा - थ्री डी रंगावलीमध्ये राहुल कळंबटे प्रथम 

राष्ट्रवादीचे सदस्यही फेटे घालून सहभागी

राष्ट्रवादी काँग्रेसमधील सहा सदस्य आमदार भास्कर जाधव समर्थक आहेत. उर्वरित सात सदस्यांनी राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरणे नाकारले. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला रत्नागिरीत यशस्वी झाला नसला तरीही राष्ट्रवादीने उमेदवारी न देणेच पसंत केले. राष्ट्रवादीचे सदस्य भगवे फेटे घालून शिवसेनेच्या विजयोत्सवात सहभागी झाले होते.