esakal | Tauktae Cyclone:रत्नागिरीत विक्रमी पाऊस; चौवीस तासात 11 इंच पावसाची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Tauktae Cyclone: रत्नागिरीत विक्रमी पाऊस; चोवीस तासात 11 इंच पावसाची नोंद

Tauktae Cyclone: रत्नागिरीत विक्रमी पाऊस; चोवीस तासात 11 इंच पावसाची नोंद

sakal_logo
By
राजेश कळंबट्टे

रत्नागिरी : रविवारी रात्रभर वादळाचा तडाखा रत्नागिरीकरांना जाणवला. किनारी भागातील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. वाऱ्याचा घोगावता आवाज, समुद्राची गाज, पत्र्याची धडकी भरवणारी थरथर यात अवघी रात्र सरली.

Record rainfall in Ratnagiri Recorded 11 inches of rain in twenty four hours kokan update news

हेही वाचा- Tauktae Impact: *मिरकरवाडा येथे भिंत कोसळली तर जयगड बंदरात बोट बुडाली

काल सायंकाळी 8.30 वाजल्यापासून आज सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चौवीस तासात सरासरी 132 मिमी तर फक्त रत्नागिरी तालुक्यात 274 मिमी म्हणजे 11 इंच पावसाची नोंद झाली. मे महिन्यातील ही विक्रमी नोंद. या वादळी पावसाने हजारो घरांसह लाखो रुपयांचे नुकसान झाले.

राजापूर तालुक्यात सर्वात कमी 208 मिमी, लांजा तालुक्यात 162 मिमी, संगमेश्वर तालुक्यात नुकसान झाली. गुहागरात 120 मिमी पाऊस झाला आहे. काल दुपारी 2 वाजता ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सोमवारी सकाळी 11 वाजता सूर्यदर्शन झाले.

Record rainfall in Ratnagiri Recorded 11 inches of rain in twenty four hours kokan update news