रिफायनरी प्रकल्प राजापुरात होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मन वळवा ; प्रमोद जठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020

रिफायनरीसाठी मुख्यमंत्र्यांचे मन वळवा

प्रमोद जठार ; भास्कर जाधवांची भूमिका प्रशंसनीय

राजापूर (रत्नागिरी) : कोकणच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावणार्‍या रिफायनरीचे समर्थन करण्याची आमदार भास्कर जाधव यांची भूमिका प्रशंसनीय आहे. रिफायनरी प्रकल्प राजापुरात होण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या आणि रिफायनरीसाठी मुख्यमंत्र्याचे मन वळवा, असे जाहीर आवाहन भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले. ‘आपल्या मनातील इच्छा-आकांक्षापेक्षा लोककल्याणासाठी लोकांच्या मनातील प्रकल्प उभारणारा वा विकास साधणारा खरा राजा असतो’ असा उपरोधिक टोलाही त्यांनी रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणार्‍या लोकप्रतिनिधींना लगावला.    

गेल्या कित्येक वर्षापासून नोकरी व्यवसायानिमित्ताने मुंबईत राहिलेले चाकरमानी कोरोनातील लॉकडाऊनमध्ये कोकणातील गावी परतले आहेत. मुंबईतील नोकरी गमावल्यास आणि लॉकडाऊनमुळे गावाला राहावे लागल्यास पुढे काय, असा प्रश्‍न त्यांना सतावत आहे. या सार्‍या चर्चेमध्ये शिवसेनेचे आमदार जाधव यांनी कोकण विकास आणि रोजगार निर्मिती करणार्‍या रिफायनरी प्रकल्प उभारणीचे समर्थन केल्याचे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा- धक्कादायक : त्या तिघी राहतात स्वच्छता गृहात अन्...

भाजप पक्षाच्या कार्यक्रमानिमित्ताने राजापुरात आलेले भाजपचे माजी आमदार जठार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आमदार जाधव यांच्या रिफायनरी समर्थनाच्या भूमिकेवर सकारात्मक भाष्य करीत समर्थकांची बाजू अधिक मजबूत केली. रिफायनरी प्रकल्पामुळे कोकण विकासाला चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे कोकणाला रिफायनरीसारख्या प्रकल्पांची आवश्यकता असून असे प्रकल्प होणे गरजेचे आहे.

हेही वाचा- या शाळांनी दाखवली तयारी : व्यवस्थापन समितीवर शैक्षणिक सत्राचे भवितव्य -

कोकणच्या विकासासासाठी आग्रही राहून रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करण्याची आमदार जाधव यांची भूमिका निश्‍चितच प्रशंसनीय आहे. रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी पुढाकार घेवून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे मन वळवावे. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, ज्येष्ठ नेते रवींद्र नागरेकर, नगरसेवक गोविंद चव्हाण, अ‍ॅड. सुशांत पवार, माजी तालुकाध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, माजी नगरसेविका शीतल पटेल, शिल्पा मराठे, मोहन घुमे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: refinery project will take place in Rajapur