विजयदुर्ग संदर्भात मंत्री उदय सामंत म्हणाले, 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

किल्ले विजयदुर्गच्या खाडीच्या बाजूची पूर्वेकडील चिलखत तटबंदीच्या एका बुरूजाच्या पायथ्याच्या संरक्षक भिंतीच्या ढासळलेल्या भागाची पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनी संयुक्‍त पहाणी केल्यानंतर श्री. सामंत माध्यमांशी बोलत होते.

देवगड ( सिंधुदुर्ग ) - किल्ले विजयदुर्गची डागडुजी करून किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देऊ तसेच जास्तीचा निधी उपलब्ध करू. यासाठी लवकरच खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेऊन पाठपुरावा करू. गरज भासल्यास पुरातत्व विभागाची मंजुरी घेऊन जिल्हा नियोजनमधूनही निधी दिला जाईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी विजयदुर्ग भेटीत आश्‍वासित केले. येत्या वर्षभरात ढासळलेल्या भागाच्या कामाला निश्‍चित सुरूवात होईल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्‍त केला. 

किल्ले विजयदुर्गच्या खाडीच्या बाजूची पूर्वेकडील चिलखत तटबंदीच्या एका बुरूजाच्या पायथ्याच्या संरक्षक भिंतीच्या ढासळलेल्या भागाची पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनी संयुक्‍त पहाणी केल्यानंतर श्री. सामंत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी आमदार प्रकाश आबीटकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, विलास साळसकर, प्रसाद करंदीकर, सरपंच प्रसाद देवधर, उपसरपंच महेश बिडये, राजेंद्र परूळेकर, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार मारूती कांबळे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहायक गटविकास अधिकारी अरूण चव्हाण उपस्थित होते. 

श्री. सामंत म्हणाले, ""विजयदुर्ग किल्याच्या डागडुजीसाठी प्राधन्याने प्रयत्न राहतील. सध्याच्या ढासळलेल्या भागाच्या डागडुजीसाठी खासदार संभाजी राजे, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अधिकाधिक निधी कसा मिळवता येईल यासाठी प्रयत्न राहतील. गरज भासल्यास जिल्हा नियोजनमधून जास्तीचा निधी उपलब्ध केला जाईल. पुढीलवर्षापर्यंत निश्‍चितच काम सुरू झालेले असेल.'' 

भेट फुकट जाणार नाही 
किल्याचा विकासात्मक आराखडा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर करून निधीची उपलब्धतता केली जाईल. आपली "विजयदुर्ग भेट फुकट जाणार नाही' असे उदय सामंत यांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Regarding Vijaydurg Minister Uday Samant Said Sindhudurg Marathi News