आंतरजिल्हा बदली झालेल्यांनाकार्यमुक्त करा ः शिक्षक समिती

आंतरजिल्हा बदली झालेल्यांनाकार्यमुक्त करा ः शिक्षक समिती

Published on

आंतरजिल्हा बदली झालेल्यांना
कार्यमुक्त कराः शिक्षक समिती
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २८ ः जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात २४ मेस ५५६ शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्याला आंतरजिल्हा बदलीतून काही शिक्षक प्राप्त होणार असून पवित्र पोर्टलमार्फत १० टक्के पदभरतीतून आणखी काही शिक्षक जिल्ह्याला प्राप्त होणार असल्याने आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या १४७ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली यापूर्वीच ऑनलाईन स्वरूपात बदली पोर्टलवरून झाली आहे. यातील काही शिक्षकांनी बदली नाकारली असून उर्वरित सुमारे १२५ शिक्षक हे बदलीने आपल्या स्व-जिल्ह्यात वा नजीकच्या जिल्ह्यात जाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही जिल्ह्यातही आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. जिल्हयात भरतीद्वारे समाधानकारक संख्येने शिक्षक प्राप्त झाल्याने तसेच पुन्हा काही शिक्षक प्राप्त होण्याची शक्यता असल्याने आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com