esakal | लांजा तालुक्यातील धक्कादायक प्रकार - अवयव काढून परस्पर विल्हेवाट
sakal

बोलून बातमी शोधा

removal of dead leopard organs Incident of lanja taluka

लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे आठ दिवसांपूर्वी एका निर्जनस्थळी असणाऱ्या एका जुन्या घरामध्ये  तो शिरला अन्....

लांजा तालुक्यातील धक्कादायक प्रकार - अवयव काढून परस्पर विल्हेवाट

sakal_logo
By
राजेश कळंबट्टे

लांजा (रत्नागिरी) :  जखमी होऊन मृत पडलेल्या बिबट्याचे अवयव काढल्याची घटना समोर आली आहे. लांजा तालुक्यात ही घटना घडली. बिबट्याचे अवयव काढून बिबट्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाचजण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे आठ दिवसांपूर्वी एका निर्जनस्थळी असणाऱ्या एका जुन्या घरामध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली होती. बराच वेळ बिबटया घराबाहेर न पडल्याने नागरिकांनी वन विभागाला कळविले होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्याने वेरवली येथे जाऊन पाहणी करन घरामध्ये बिबट्या नसल्याचे नागरिकांना सांगितल्याने नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला होता. त्यांनतर मात्र 2 ते 3 दिवस त्याच घरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येऊ लागल्याने गुरख्यानी आत जाऊन पाहिले असता मृतावस्थेत बिबट्या आढळून आला.

हेही वाचा- देशप्रेम लागले ओसरू ! स्वस्तातील चिनी वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य -

या घटनेची समज कोणालाही न देता गावातील 5 जणांनी बिबट्याचे अवयव काढून घेतले व हे प्रकरण दडपण्याचा प्रकार सुरू झाला. बिबट्याचे अवयव काढून परस्पर दफन करण्यात आले. गावातील 3 नागरिकांसह अजून प्रमुख पदावर असणाऱ्या 2 व्यक्तीच्या मदतीने मृत बिबट्याला दफन केल्याचा हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या घटनेची खबर वनविभागाला समजताच घटनास्थळी दाखल झालेल्या अधिकार्‍यांनी त्या 5 जणांची कसून चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा- श्रींना 28 नैवेद्याच्या पानांची परंपरा `येथे` आजही कायम -

दरम्यान, त्या 5 ही जणांना ताब्यात घेऊन दफन केलेल्या बिबट्याला बाहेर काढले. त्यानंतर वनविभागाने पंचनामा केला असता बिबट्याचे काही अवयव गायब असल्याचे निदर्शनस आले आहे. जखमी होऊन बिबट्याचा मृत्यू झाला असला तरी त्याचे अवयव काढून परस्पर दफन करणारा प्रकार उजेडात आला आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून अधिक तपास सुरू झाला असून बिबट्याचे अवयव काढणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात अजून काही चेहरे समोर येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

संपादन - अर्चना बनगे

loading image