esakal | Chiplun Flood 2021: चिपळूणध्ये रेस्क्यू टीम दाखल; बचावकार्य सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Chiplun Flood 2021: चिपळूणध्ये रेस्क्यू  टीम दाखल

Chiplun Flood 2021: चिपळूणध्ये रेस्क्यू टीम दाखल

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने चिपळूण, राजापूर, खेड, लांजा, संगमेश्वर (Chiplun, Rajapur, Khed, Lanza, Sangameshwar,Ratnagiri)आणि रत्नागिरीमध्ये दाणादाण उडवुन दिली आहे. अतिशय भयानक पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक नागरिक आडकुन पडले आहेत. सोशल मीडियावर मदतीसाठी आचना करताना अनेक पोस्ट, व्हिडिओ पडत आहेत. मात्र मदत कार्य अजून पोहचलेले नाही. आमदार आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना रत्नागिरी सोडून चिपळूणला रवाना होण्याच्या सूचना केल्या आहेत. पालकमंत्री अनिल परब मंत्री उदय सामंत रत्नागिरीत असल्याने त्यांनी मदत कार्याला गती मिळाली आहे. चिपळूण पालिकेच्या 2 बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. रत्नागिरी 1, पोलिस विभागाकडील 1, कोस्टगार्डची 1, अश्या 3 बोटी, एनडीआरएफच्या पथकांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करून अनेकांना सुरक्षित स्थळी हलविले.(rescue-operation-started-in-chiplun-flood-2021-live-update-marathi-news-akb84)

हाय टाईड (उधाणाची भरती) आणि मुसळधार पाऊस एकत्र आल्याने जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. २००५ मध्ये निर्माण झालेल्या परिस्थिती पेक्षाही भयानक स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात प्रमुख शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर येऊन शहरांमध्ये पाणी शिरले आहे. चिपळूण शहराची तर अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात सात फुटाच्या वर पाणी शिरल्याने संपूर्ण शहर पाण्याखाली गेले आहे. अनेक नागरिक इमारतींमध्ये अडकले आहेत. ते मदतीची याचना करीत आहेत. त्यांना सकाळी साडे १० वाजेपर्यत कोणतीही मदत मिळाली नव्हती. त्यानंतर मात्र मदत कार्याला गती आली. मंत्री उदय सामंत यांनी बैठका रद्द करून आपल्या सहकाऱ्यांना घेऊन मदतीसाठी चिपळूणला रवाना झालले.आमदार आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी तत्काल आढावा घेऊ, कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

हेही वाचा: Chiplun Flood: चिपळूणात महाप्रलय : अनेक कुटुंबे पाण्यात अडकली

पोलिस अधीक्षकांना फोन केला. त्यांनी १ बोट दिली. गुहागर ३ आणि मंडणगड बोट देतो. १० पंधरा मिनिटात यंत्रणा पोहचेल, एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ रत्नागिरी सोडा, असे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे पदाधिकारी बाळा कदम यांनी एक चिपळुणच्या भयानक परिस्थितीबाबत सोशल मिडियावर भवानीक आवाहन करून शिवसैनिक, सामाजिक संस्था, प्रशासनाला मदतीची भावनीक साद घातली.

ते म्हणाले, चिपळूण तालुक्यातील सर्व राजकीय पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांना, सामाजित संस्थार, यांनी कृपया पूर आोसरल्यानंतर चिपळूण शहराकडे धाव घ्यावी. भयानक परिस्थिती आहे. अनेक लोक आडकली आहेत. सकरकारी मदत आपुरी पडत आहे. एनडीआरएप, हेलिकॉप्टर, ही सर्व मदत अपूर पडणार आहे. मदत कार्यासाठी चिपळूणात यावे ही विनंती. चिपळूण शहराव २००५ प्रमाणे मोठे संकट आले आहे. शहरात सात फुट पाणी असन ते वाढत चालले आहे. आमच्या पहिल्यामजल्यावर पाणी आले.

श्री रत्नागिरीचा राजा मंडळ धावले पुरग्रस्तांच्या मदतीला

रत्नागिरी, चिपळूण, खेड आदी भागात पुराने थैमान घातले आहे. अनेकजण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. या साऱ्यांच्या मदतीला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रत्नागिरीचा राजा, मारुती मंदिर मंडळ धावले आहे. हे मंडळ पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांची मदत करणार आहे. एक डी आर एफ टीम साताऱ्यात पोहचली असून लवकरच ती चिपळूण, खेड येथे दाखल होणार आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रशासन पूर्ण ताकदीने काम करतआहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या पुरपरिस्थितीचा आढावा देखील ना. उदय सामंत यांनी घेतला आहे.

loading image