राजापूर : येथील अभ्यासक डॉ. प्रतीक नाटेकर (Dr. Prateek Natekar) यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळणाऱ्या निरूपद्रवी काळ्या बुरशींवर (Black Mildew) संशोधन केले असून, त्यामध्ये त्यांनी जागतिकस्तरीय काळ्या बुरशींच्या आठ नवीन प्रजातींचा शोध लावला आहे, तर पाच नवीन प्रजाती या पहिल्यांदाच भारतामधून नोंद झाल्या आहेत.