पाकचे तुकडे पाडल्यास दहशतवाद थांबेल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

रत्नागिरी - पाकिस्तानची आर्थिक नाकाबंदी आणि त्याचे तीन तुकडे पाडल्यास दहशतवादी कारवाया थांबतील. एक भाग अफगाणिस्तानने काबीज करावा. बलुचिस्तान, सिंध व पंजाब यांचे तीन स्वतंत्र देश बनविल्यास दहशतवाद संपेल,असे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले.

रत्नागिरी - पाकिस्तानची आर्थिक नाकाबंदी आणि त्याचे तीन तुकडे पाडल्यास दहशतवादी कारवाया थांबतील. एक भाग अफगाणिस्तानने काबीज करावा. बलुचिस्तान, सिंध व पंजाब यांचे तीन स्वतंत्र देश बनविल्यास दहशतवाद संपेल,असे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले.

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात पुलवामा, बालाकोटनंतर या विषयावर ते बोलत होते. त्यांनी वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्याकडे त्यांनी लिहिलेल्या सर्व पुस्तकांचा संच प्रदान केला.महाजन म्हणाले,भारताशी पाकिस्तान पारंपरिक युद्ध करू शकत नाही. त्यामुळे सीमांवरून दहशतवादी पाठवून भारतात अस्थिरता, हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. याकरता आपण जागरूक राहिले पाहिजे. प्रत्येकाने सैन्यात जायला नको, पण आहात त्या ठिकाणी राहून सैनिक बना व देशप्रेम दाखवा. कोकण किनारपट्टीवरून आतंकवादी येऊ शकतात, त्यामुळे रत्नागिरीतील लोकांनीही सावध राहावे, समाजमाध्यमातून देशविरोधी पोस्ट व्हायरल करू नका.महाजन म्हणाले, भारत-पाकिस्तान संबंध हे अशांतच राहणार आहेत. तो शून्याचा पाढा आहे. भारताच्या सर्व पंतप्रधानांनी शांततेचे प्रयत्न केले, पण अपयश आले.

बालाकोटच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर मात्र भारताचे नाव जगात गाजले. मिराज, सुखोई व एआय या १० विमानांनी मोहीम फत्ते केली. त्याचे सर्व पुरावे आंतरराष्ट्रीय पातळीवर दिली आहे. त्यामुळे पुरावे नाहीत, असे राजकारण केले जात आहे.

मतपेटीचे राजकारण थांबवा
देशप्रेम फक्त मेणबत्ती जाळून एक दिवस नको तर ३६५ दिवस दाखविले पाहिजे. १०० टक्के मतदान झाले पाहिजे, मतपेटीचे राजकारण थांबवा. सुरक्षेला प्राधान्य द्या, असेही महाजन म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired Brigadier Hemant Mahajan comment