कोकण पदवीधरचा आढावा

कोकण पदवीधरचा आढावा

- rat३p१.jpg-
P२४M८७४७२
चिपळूण : येथे महायुतीच्या सभेत रवींद्र चव्हाण यांचे स्वागत करताना आशिष खातू व भाजपचे पदाधिकारी

मंत्री चव्हाणांकडून मतदारसंघाचा आढावा

कोकण पदवीधरची मोर्चेबांधणी सुरू; गुहागरमध्ये महायुतीची बैठक

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण, ता. ३ : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिपळूण येथे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चिपळूण व गुहागर विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक २६जून ला होणार आहे. या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे निरंजन डावखरे हे विद्यमान आमदार आहेत. पुन्हा एकदा या मतदारसंघांमध्ये निरंजन डावखरे हेच उमेदवार म्हणून भाजपाकडून निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर आज ही बैठक घेण्यात आली. मंत्री चव्हाण यांनी भाजपसह अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. भाजप तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर आणि जिल्हा उपाध्यक्ष आशिष खातू यांनी चव्हाण यांचे स्वागत केले. या वेळी रवींद्र चव्हाण यांनी सर्व पदाधिकाऱ्यांकडून मतदार नोंदणीचा आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कोकण पदवीधर मतदारसंघातून पुन्हा एकदा डावखरे यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी जोमाने काम करा, असे आवाहन चव्हाण यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना केले आहे. या बैठकीला माजी आमदार विनय नातू, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतूल काळसेकर, जिल्हाध्यक्ष केदार साठे, चिपळूण-संगमेश्वर विधानसभेचे आमदार शेखर निकम उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com