पारंपारिक व दुर्मिळ वनस्पती संवर्धनासाठी बक्षीस योजना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

कुडाळ - वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरण अंतर्गत पारंपारिक वनस्पती संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना लागू केली आहे.

कुडाळ - वनस्पती जाती आणि शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरण अंतर्गत पारंपारिक वनस्पती संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना लागू केली आहे.

भारत सरकारमार्फत वनस्पती जाती संवर्धनाकरिता तसेच पारंपारिक नामशेष होत चाललेल्या जातीच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. पारंपारिक वैशिष्ट्यपूर्ण जातीच्या प्रचार - प्रसार व संवर्धनासाठी जे शेतकरी किंवा शेतकरी गट विशेष प्रयत्न करीत आहेत त्यांच्यासाठी अधिकृत मान्यता ओळख व बक्षीस योजना सुरू करण्यात आली आहे. याकरिता शेतकरी गट व शेतकरी यांच्याकडून विहित नमुन्यात निशुल्क अर्ज शेतकऱ्यांच्या प्रतिज्ञापत्रासह मागवण्यात येत आहेत. यामध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना रुपये दीड लाखाचे प्रथम बक्षीस असून एक लाखाची वीस बक्षिसे आहेत. या संदर्भात माहिती व कागदपत्रासह अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 28 जून आहे. अर्ज भरण्याकरिता व योजने संदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. मंदार गीते, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख कृषी विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reward scheme for the promotion of traditional plants