पिस्तूलाचा धाक दाखवून लुटणाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

धोंडवडवली या ठिकाणी वाडा भिवंडी महामार्ग वर भिवंडी च्या दिशेने जात असलेल्या एका टेम्पो ला थांबवून चालकास पिस्तूलाचा धाक धाकऊन  लुटणाऱ्या दोघांना पोलिसांच्या सतर्कतेने पकडण्यात आले. ही घटना काल संध्याकाळी घडली.

वज्रेश्वरी :  भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलिस ठाणे हद्दीतील धोंडवडवली या ठिकाणी वाडा भिवंडी महामार्ग वर भिवंडी च्या दिशेने जात असलेल्या एका टेम्पो ला थांबवून चालकास पिस्तूलाचा धाक धाकऊन  लुटणाऱ्या दोघांना पोलिसांच्या सतर्कतेने पकडण्यात आले. ही घटना काल संध्याकाळी घडली.

अब्दुल राजीद मुजिद कुरेशी (वय 32 असून रा. कलकत्ता)  सध्या कुडूस येथे आणि रोशन महंमद अली शेख (वय 32 रा. शांती नगर भिवंडी) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे दोघे मित्र आहेत.

काल संध्याकाळी कुडूस येथून जिप्सम कंपनी चा माल वाहतूक करणारा टेम्पो हा वडपे भिवंडी येथे जात होता, सदर टेम्पो भिवंडी वाडा महामार्गावर धोंडवडवली येथे आल्यावर या दोघांनी रिक्षा तुन पाठलाग केला. टेम्पो समोर रिक्षा आडवी लावून ड्रायव्हरच्या कानशिलावर पिस्तूल ठेऊन त्याच्याकडचे अकराशे रुपये आणि मोबाइल हिसकाऊन घेतले.

त्याच दरम्यान या महामार्ग वर गस्त घालणारे पोलिस नाईक दिनेश चन्ने यांना स्थानिक नागरिकानी फोन केला असता त्यांनी या दोघांचा पाठलाग करून शिताफीने त्याना पकडले. दरम्यान हे दोघे वडवली येथे रिक्षा घेऊन जात होते त्यांची झडती घेतली. त्यात या दोघांजवळ दोन देशी कट्टे व  पिस्तुल ज्यात गोळ्या लोड केलेल्या होत्या हे सापडले. 

या वेळी घटना स्थळी गणेशपुरी पोलीस ठाणेचे सपोनि महेश सागडे, पोलिस उपनिरीक्षक विशाल वायकर यानी दोघा आरोपीना अटक करून गजाआड केले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbers who threatened with pistol arrested