RT PCR antigen test hits 251 people in Ratnagiri in one day covid 19 update ratnagiri latest news
RT PCR antigen test hits 251 people in Ratnagiri in one day covid 19 update ratnagiri latest news

धक्कादायक: आरटीपीसीआर, ऍण्टीजेन टेस्टमध्ये एका दिवसात रत्नागिरीत सापडले 251 बाधित

Published on

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांतील विक्रमी 251 कोरोनाबाधित आज आढळले. सर्वांत जास्त 74 बाधित रत्नागिरी तालुक्‍यात आहेत. जिल्ह्यात आता बाधितांची संख्या 12 हजार 271 झाली. उत्सव, सणासुदीच्या निमित्ताने जिल्ह्याचा थेट मुंबईशी संपर्क येत असल्याने हा आकडा वाढत आहे. 

संगमेश्‍वरमधील 85 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या 389 झाली. आज 175 रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या 10 हजार 750 आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.60 टक्के आहे. ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 854 आहे, तर 928 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमण होत आहे. शिमगोत्सवासह अन्य सणासुदीच्या निमित्ताने चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले होते आणि अजून होत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढत असल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यात आज आरटीपीसीआर 150, तर ऍण्टीजेन चाचणीत 101 बाधित सापडले. यामुळे रुग्णांची संख्या 12 हजार 271 झाली. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या 
रत्नागिरी - 74 
दापोली- 19 
खेड- 25 
गुहागर- 19 
चिपळूण- 45 
संगमेश्‍वर- 41 
मंडणगड- 2 
लांजा- 12 
राजापूर- 14 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com