श्रीमंत शेतकऱ्यांकडून होणार आता १५ लाखाची वसूली ; १८६ जणांना आल्या नोटिसा

rupees 15 lakh return to government by rich farmers in ratnagiri under the kisan policy
rupees 15 lakh return to government by rich farmers in ratnagiri under the kisan policy
Updated on

राजापूर (रत्नागिरी) : सर्वसामान्य शेतकऱ्यांना साहाय्य करण्याच्या उद्देशाने केंद्राने सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या तालुक्‍यातील श्रीमंत शेतकऱ्यांकडून त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या सुमारे १५ लाख ४८ हजार रुपयांची वसुली करण्याची मोहीम महसूल प्रशासनाने हाती घेतली आहे.

तालुक्‍यातील १८६ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. खात्यामध्ये शासनाकडून जमा झालेली रक्कम प्रशासनाकडे जमा करण्याचे सूचित केले आहे. केंद्राने पंतप्रधान किसान सन्मान योजना राबविली आहे. त्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्याच्या बॅंक खात्यामध्ये वर्षाला सहा हजार रुपयांची शासनाकडून रक्कम जमा होते. ही रक्कम तीन टप्प्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे जमा होते. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीच्या झालेल्या चौकशीमध्ये अनेक लाभार्थी करदेय पात्र म्हणजे श्रीमंत लाभार्थी असल्याचे नुकतेच उघडकीस आले. अशा लाभार्थ्यांकडून त्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा झालेल्या रक्कमेची वसुली करण्याची मोहीम महसूल प्रशासनाने हाती घेतली आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे तालुक्‍यामध्ये २१ हजार ४७८ लाभार्थी आहेत. त्यापैकी २५८ लाभार्थी करदेय पात्र लाभार्थी वा 
आर्थिकदृष्ट्या सक्षम लाभार्थी असल्याचे प्रशासनाने लाभार्थ्यांच्या केलेल्या चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. या लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यामध्ये शासनाकडून सुमारे १५ लाख ४८ हजार रुपये जमा झाले आहेत.

या रक्कमेची वसुली करण्याच्या अनुषंगाने महसूल प्रशासनाने २५८ पैकी १८६ जणांना बॅंक खात्यामध्ये जमा झालेली रक्कम तातडीने प्रशासनाकडे जमा करण्याची नोटीस बजावली आहे. या नोटिशीप्रमाणे संबंधित शेतकरी त्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा झालेली रक्कम प्रत्यक्षात जमा करणार की नाही, याकडे लक्ष लागले आहे.

दृष्टिक्षेपात राजापूर 

  •   पंतप्रधान किसान सन्मान योजना   
  •   एकूण लाभार्थी ः २१ हजार ४७८
  •   रक्कम वसुली होत असलेले लाभार्थी ः २५८
  •   नोटीस बजावलेले लाभार्थी ः १८६
  •   वसुलीची रक्कम ः १५ लाख ४८ हजार रुपये

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com