...तोपर्यंत केसरकर भाजपमध्ये जाणार नाहीत, दिशाभूल थांबवा ; राणेंवरून शिवसेना नेत्याचा सल्ला

rupesh raul critiseid on mayor snaju parab in sawantwadi
rupesh raul critiseid on mayor snaju parab in sawantwadi

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : विधानसभा निवडणुकीत शेवटचे चार दिवस आमदार दीपक केसरकर यांच्याकडे पे रोलवर काम करून नगराध्यक्ष संजू परब यांनी भविष्यातील आपले स्वप्न साकार करण्यासाठी राजन तेलींना बळीचा बकरा बनवला. जोपर्यंत राणे भाजपमध्ये असतील तोपर्यंत केसरकर भाजपमध्ये जाणार नाहीत. त्यामुळे नौटंकी करून जनतेची दिशाभूल करणे त्यांनी थांबवावे, असा सल्ला शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज दिला. आमदार केसरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदवेळी ते बोलत होते. यावेळी तेलींकडे पे रोलवर काम केल्याच्या परब यांनी केलेल्या टीकेचा त्यांनी समाचार घेतला.

राऊळ म्हणाले, 'तेलींना विधानसभेत पाडण्यासाठी निवडणुकीच्या शेवटच्या चार दिवसात नगराध्यक्ष परब यांची कोणती भूमिका होती हे तेलींनाही माहित आहे. त्यांनी प्रचार करताना काय प्रचार केला याचे पुरावेही आहेत. आज भाजप प्रवेशावरुन केसरकरांवर बोलणाऱ्या परब यांनी त्यावेळेस शिवसेना प्रवेशासाठी गोव्यात जावून आमदार केसरकर यांना पायघड्या का घातल्या? खासदारांच्या घरी जावून त्यांनी कोणाची शप्पथ घेत आश्‍वासन दिले? याचे उत्तर द्यावे. अन्यथा ते ज्या देवतेला मानतात त्याठिकाणी मला घेऊन जावे. राणे आणि केसरकर यांच्यामध्ये वैचारिक लढा आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार पटल्याने केसरकर शिवसेनेमध्ये आले. त्यामुळे जोपर्यंत राणे भाजपमध्ये असतील तोपर्यंत केसरकर भाजपमध्ये जाणार नाहीत. वेगवेगळी वळणे देऊन खोटे आरोप करून नौटंकी करणे परब यांना चांगलेच ज्ञात आहे. त्यामुळे यापुढे त्यांनी आपले नौटंकी थांबवावी.'

राऊळ पुढे म्हणाले, 'विधानसभा निवडणुकीमध्ये भविष्यात स्वतःची स्वप्न साकार करण्यासाठी परबांनी विरोधात काम करून तेलींना बळीचा बकरा बनवला. त्यांची हीच नौटंकी राणे कुटुंबियांना समजल्याने सावंतवाडीत झालेल्या मत्स्य महोत्सवातही राणे कुटुंबीयांनी पाठ फिरवली. यामुळे सैरभैर झालेले संजू परब उठ सूठ नाहक टीका करत आहेत.' यावेळी एकनाथ नारोजी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, महिला तालुका संघटक अपर्णा कोठावळे, शब्बीर मणियार, तालुकाप्रमुख बाळू परब आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com